supreme court main.jpg 
देश

मराठा आरक्षण स्थगितीवरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी थोड्यावेळासाठी तहकूब

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली- मराठा आरक्षण स्थगितीवरील सर्वोच्च न्यायालयात आज (दि.27) सुनावणी सुरु आहे. परंतु, थोड्या वेळासाठी ही सुनावणी तहकूब करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारची पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर सुनावणी करण्याची मागणी आहे. आज ही सुनावणी तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर सुरु झाली. त्यातच महाराष्ट्र सरकारचे वकील मुकूल रोहतगी हेही गैरहजर असल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने थोड्यावेळासाठी ही सुनावणी तहकूब केली. 

याचिकाकर्त्यांनी पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे हे प्रकरण देण्याची मागणी केली होती. त्याप्रमाणे पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे याची सुनावणीसाठी परवानगी दिली होती. तरीही हे प्रकरण आज तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे सुनावणीसाठी आल्याचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

न्यायालयासमोर भक्कमपणे बाजू मांडण्याची जबाबदारी राज्य सरकारची असल्याचे विनोद पाटील यांनी सांगितले. 

दरम्यान, मराठा आरक्षणावर राज्याचे सार्वजनिक मंत्री अशोक चव्हाण यांनी सुप्रीम कोर्टाच्या पीठासमोर यापूर्वीच सुनावणी झाली आहे. त्यामुळे मंगळवारची सुनावणी पुन्हा त्याच पीठासमोर होणे राज्य सरकारला मान्य नाही. घटनापीठासमोर हा विषय गेला पाहिजे, अशी भूमिका मांडली होती. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ज्ञानेश कुमारांना हटवणं सोपं नाही, नोटीस ते राष्ट्रपतींच्या आदेशापर्यंत अनेक टप्पे; कशी असते प्रक्रिया?

Bike Accident : बिडकीन–शेकटा मार्गावर भीषण अपघात! दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू; नातेवाइकांकडून घातपाताचा संशय, पोलिसांचा तपास सुरू

Satana Ganpati Visarjan : सटाण्यात अभूतपूर्ण जल्लोषात गणरायाला निरोप! शहराच्या इतिहासात प्रथमच उशिरा विसर्जन मिरवणूक

Dilip Walse Patil : दूध भेसळ प्रकरणावरून बदनामी करणाऱ्यांना १०० कोटींची नोटीस: उच्च न्यायालयात दावा दाखल करणार

ECI SIR: ‘एसआयआर’ वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्तांची बैठक; मुद्देनिहाय स्पष्टीकरण...

SCROLL FOR NEXT