Railway_Slum_Area 
देश

रेल्वेरुळाभोवतीच्या झोपड्या तीन महिन्यांत हटवा; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील १४० किलोमीटर लांबीच्या रेल्वे रूळाभोवतीच्या झोपडपट्ट्या तीन महिन्यांमध्ये हटवा असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने यंत्रणेला दिले आहेत. या कामामध्ये कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही, असेही न्यायालयाकडून सुनावण्यात आले. या झोपडपट्ट्या हटविण्याचे काम टप्प्याटप्प्याने केले जाणार आहे. 

या झोपडपट्ट्या हटविण्याच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर कोणत्याही न्यायालयाने त्याला कसल्याही प्रकारची स्थगिती देता कामा नये, तसेच हे अतिक्रमण हटविण्याच्या मुद्यावरून कोणत्याही प्रकारचे आदेश देण्यात आले, तर त्याची अंमलबजावणी केली जाणार किंवा ते लागू देखील होणार नाहीत असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. न्या. अरुण मिश्रा, न्या.बी.आर.गवई आणि न्या. कृष्णमुरारी यांच्या खंडपीठाने हे निर्देश दिले आहेत. पर्यावरणीय प्रदूषण (प्रतिबंध आणि नियंत्रण) प्राधिकरणाने यासंदर्भात दाखल केलेल्या अहवालाची न्यायालयाने नोंद घेतानाच येथील कचरा आणि अतिक्रमण साधारणपणे महिनाभरात हटविण्यात यावे असे निर्देश दिले आहेत.

आराखडा आखण्याची मागणी 
या भागांतील झोपड्या टप्प्याटप्प्याने हटविण्यासाठी सर्वच भागधारकांनी एखादा सर्वसमावेशक आराखडा तयार करावा. सेफ्टीझोनमध्ये असलेल्या झोपड्या तीन महिन्यांच्या कालावधीत हटविण्यात याव्यात यामध्ये राजकीय अथवा अन्य कोणत्याही स्वरूपाचा हस्तक्षेप होता कामा नये. अन्य कोणत्याही कनिष्ठ न्यायालयाने या कामांना स्थगिती देणारे आदेश देता कामा नये, असेही न्यायालयाने नमूद केले आहे. 

स्वच्छतेवर भर 
न्यायालयाने या परिसरातील स्वच्छतेकडे विशेष लक्ष पुरविल्याचे दिसून येते. परिसरातील प्लॅस्टिकच्या बॅगा आणि अन्य कचरा तीन महिन्यांच्या आत साफ केला जावा, असे निर्देश देतानाच न्यायालयाने सर्वच भागधारकांना तातडीने बैठक घेण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये रेल्वे प्रशासन, दिल्ली सरकार आणि महापालिका आणि दिल्ली नागरी निवारा विकास मंडळ यांचा समावेश आहे.

- देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मंजूर! शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार कोण पाहणार? मोदी सरकारने 'या' मंत्र्यावर सोपवली जबाबदारी

IND vs WI ODI Squad: यशस्वी, ऋतुराज IN; श्रेयस, इशान, बुमराहसह ७ खेळाडू OUT! वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी भारताचा संभाव्य संघ... असं का होणार?

Live Updates Marathi : स्वरूप नगर भागात बांधकामाधीन असलेले एक घर कोसळले

Chhatrapati Sambhajinagar News: पैठण-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील सिमेंट रस्ता अचानक खचला; बिडकीनमध्ये खळबळ

Baramati News: माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालयाची प्लेसमेंटमध्ये दमदार कामगिरी; २३८ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांत निवड

SCROLL FOR NEXT