Supreme Court  sakal
देश

Renaming Places: प्राचीन ठिकाणांची नाव बदलण्यावरुन सुप्रीम कोर्ट भडकलं! फेटाळली जनहित याचिका

अॅड. अश्विनी उपाध्याय यांनी ही याचिका दाखल केली होती. यासाठी विशेष पॅनल नेमण्याची मागणीही त्यांनी केली होती.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : भारतातील प्राचीन ठिकाणांची नाव बदलण्यासाठी अॅड. अश्विनी उपाध्याय यांनी सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. यासाठी विशेष पॅनल नेमण्याची मागणीही त्यांनी याद्वारे केली आहे.

ही याचिका सुप्रीम कोर्टानं सोमवारी फेटाळून लावली. तसेच याचिकाकर्त्यांना कोर्टानं चांगलंच झापलं. तुम्हाला देश धगधगत ठेवायचाय का? असा सवाल कोर्टानं केला आहे. (Supreme Court outraged by renaming of ancient places PIL dismissed)

न्या. के. एम. जोसेफ आणि न्या. बी. व्ही. नागरत्न या याचिकेच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. त्यांनी म्हटलं की, याद्वारे त्या गोष्टी उकरुन काढण्याचा प्रयत्न होतोय ज्यामुळं देश धगधगत राहिलं.

भारत हा इतिहासात कैद होऊ शकत नाही, असंही कोर्टानं यावेळी टिप्पणी करताना म्हटलं. हे सत्य आहे की, आपल्या देशावर परदेशी शक्तींनी आक्रमणं केली आणि राज्य केलं. त्यामुळं आपल्या इतिहासातील हा निवडक भाग आपणं नाहीसा करु शकत नाही, असंही खंडपीठानं सुनावणीदरम्यान म्हटलं.

हिंदू हा धर्म नाही तर जीवन जगण्याचा मार्ग

सुप्रीम कोर्टानं पुढं असंही म्हटलं की, भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. तसेच हिंदू हा धर्म नाही तर तो जगण्याचा मार्ग आहे.

यानं सर्वकाही आत्मसात केलं आहे त्यात कट्टरता नाही. भूतकाळ खोदल्याने केवळ विसंगती दिसून येईल याद्वारे वर्तमान आणि भावी पिढ्यांना त्रास देऊ नये, असंही खंडपीठानं यावेळी म्हटलं.

याचिकेत काय म्हटलं?

अॅड. अश्विनी उपाध्याय यांनी याचिकेत म्हटलं की, मुघल गार्डनं नुकतंच अमृत उद्यानं असं नामकरण करण्यात आलं. पण सरकारनं रस्त्यांची नाव बदलेली नाहीत.

आक्रमकणकर्त्यांची ही नावं कायम ठेवणं हे देशाचं सार्वभौमत्व आणि राज्यघटनेनं दिलेल्या इतर नागरी हक्कांच्या विरोधात आहे, असा दावाही या जनहित याचिकेतून करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shetkari Karj Mafi : ३० जूनची मुदत उलटली; शेतकरी कर्जमाफीला पुन्हा विलंब, नवीन डेडलाईन काय?

Latest Marathi News Live Update : 'बीएलओ' आजपासून आपल्या दारी; रत्नागिरी जिल्ह्यातील १३ लाख मतदारांची पडताळणी

Patan Rain : कोयना पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाचे पुनरागमन; ९.२१ टीएमसी पाणीसाठा

Maharashtra Rain Alert : राज्यात पुढील ५ दिवस जोरदार पाऊस; 'या' भागांत रेड अलर्ट जारी, तुमच्या जिल्ह्यांत कसे असेल हवामान? जाणून घ्या

ढिंग टांग : जोनाथनचा सल्ला..!

SCROLL FOR NEXT