DELHI CM ARVIND KEJARIWAL 
देश

'देशात तुटवटा असताना दिल्लीने गरजेपेक्षा चारपट जास्त ऑक्सिजन मागवला'

सूरज यादव

सर्वोच्च न्यायालायने ऑक्सिजनबाबत एक उपसमिती स्थापन केली. त्या समितीकडून आता दिल्ली सरकारवर प्रश्न उपस्थित केले आहेत. स

नवी दिल्ली - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात अनेक राज्यांना ऑक्सिजनची कमतरता भासली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालायने ऑक्सिजनबाबत एक उपसमिती स्थापन केली. त्या समितीकडून आता दिल्ली सरकारवर प्रश्न उपस्थित केले आहेत. सर्वोच्च न्यायालयाला समितीने दिलेल्या अहवालात म्हटलं आहे की, 25 एप्रिल ते 10 मे या कालावधीत कोरोनाची दुसरी लाट असताना दिल्लीने गरजेपेक्षा चारपट जास्त ऑक्सिजन वाढवला.

सर्वोच्च न्यायालयाला समितीने असंही सांगितलं आहे की, दिल्लीला जर अतिरिक्त ऑक्सिजनचा पुरवठा केला असता तर अधिक रुग्णसंख्या असलेल्या 12 राज्यांमध्ये ऑक्सिजनचं संकट निर्माण झालं असतं. दिल्ली सरकारने 1140 MT ऑक्सिजन वापरला. जो बेड क्षमतेच्या आधारावर तयार करण्यात आलेल्या फॉर्म्युल्यानुसार 289 मेट्रिक टन या प्रमाणाच्या चारपट होता.

अहवालानुसार, पेट्रोलियम आणि ऑक्सिजन सुरक्षा संघटनेने सांगितलं की, दिल्लीत अधिक ऑक्सिजन होता त्यामुळे इतर राज्यांच्या ऑक्सिजन पुरवठ्यावर परिणाम होत होता. त्यामुळे दिल्लीला अतिरिक्त ऑक्सिन पुरवल्यास देशावर संकट ओढावू शकतं.

न्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने दिल्लीतील ऑक्सिजन पुरवठ्याबाबत काही निर्देश दिले होते. त्यात आप सरकारने केलेल्या याचिकेवर न्यायालयाने म्हटलं होतं की, केंद्राने दिल्लीला 700 मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा सुरु ठेवावा. तसंच ऑक्सिजनच्या वापराबाबत एम्सचे संचालक रणदिप गुलेरिया यांच्या अध्यक्षतेखाली ऑडिटसाठी एक समिती स्थापन केली होती.

समितीने दिल्लीतील चार रुग्णालयात काही बेड असतानाही ऑक्सिजनचा वापर अधिक झाल्याचा दावा केला. दिल्लीतील रुग्णालायंकडून पॅनेलला दिलेल्या आकडेवारीत फरक आढळून आला आहे. सिंघल रुग्णालय, अरुणा आसिफ अली रुग्णालय, ESIC मॉडेल रुग्णालय आणि लायफरे रुग्णालयात काही बेड होते आणि त्यांचा डेटा चुकीचा होता. दिल्लीत ऑक्सिजनबाबत करण्यात आलेला दावा प्रत्यक्षातील परिस्थितीपेक्षा जास्त होता असंही समितीने म्हटलं आहे. दुसरीकडे दिल्ली सरकारने 29 एप्रिल ते 10 मे या काळात 350 मेट्रिक टनपेक्षा अधिक ऑक्सिजन वापरला नसल्याचं म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रावर पुन्हा पावसाचे संकट, थंडीची लाट ओसरली; हवामान विभागाचा अंदाज

CJI BR Gavai यांच्या कार्यकाळात सर्वोच्च न्यायालयात १० दलित न्यायाधीशांची नियुक्ती, ओबीसी कीती?

Pune Municipal Corporation Election : नऊ प्रभागांमध्ये महिला राज; निवडणुकीत मते ठरणार निर्णायक, पुण्यात ८३ महिला नगरसेवक निवडले जाणार

Jalna News: जालना हादरलं! दुचाकी वादातून तरुणाची मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू

Dharashiv Accident: धाराशिवमधील अपघातात तिघे ठार; मोटारीचा टायर फुटून अपघात, ११ जण जखमी

SCROLL FOR NEXT