PM Modi Government Esakal
देश

PM Modi Government: मोदी सरकारमध्ये शपथ घेतलेल्या मंत्र्याचा 15 तासांतच राजीनामा? कारणही आलं समोर

NDA Government: नरेंद्र मोदी यांनी काल तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासोबत ७१ जणांनी शपथ घेतली. त्यावेळी केरळमधून विजयी झाल्यानंतर पहिल्यांदाच संसदेत पोहोचलेल्या सुरेश गोपींनी काल मंत्रीपदाची शपथ घेतली. आता त्यांनी मंत्रीपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

केरळमधील भाजपचे पहिले खासदार सुरेश गोपी, यांनी काल (रविवारी) केंद्रीय राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली ते त्यांच्या मंत्रिपदावरून पायउतार होण्याची शक्यता आहे. शपथविधी सोहळ्यानंतर दिल्लीतील एका प्रादेशिक वाहिनीशी बोलताना ते म्हणाले की, त्यांनी मंत्रिपदाची मागणी केलेली नाही आणि लवकरच या पदावरून त्यांना मुक्त केले जाईल अशी आशा आहे.

मंत्रिपद सोडण्याचे कारण सांगताना सुरेश गोपी म्हणाले की, मी काही चित्रपट साइन केले आहेत आणि ते मला करायचे आहेत. सुरेश गोपी म्हणाले, 'मी त्रिशूरचा खासदार म्हणून काम करेन.' सुरेश गोपी यांनी त्रिशूर लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला आणि केरळमधील भाजपचे पहिले खासदार म्हणून इतिहासात आपले नाव नोंदवले आहे. सुरेश यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय) उमेदवार व्हीएस सुनीलकुमार यांचा ७४६८६ मतांनी पराभव केला होता.

सुरेश गोपी म्हणाले, 'खासदार म्हणून काम करण्याचे माझे ध्येय आहे. मी काहीही मागितले नाही, मी म्हणालो की, मला या पदाची गरज नाही. मला वाटते की मी लवकरच पदावरून मुक्त होईल. त्रिशूरच्या मतदारांना कोणतीही अडचण नाही. त्यांना हे माहित आहे आणि खासदार म्हणून मी त्यांच्यासाठी खरोखर चांगले काम करेन. त्याचबरोबर मला माझे चित्रपट कोणत्याही परिस्थितीत करायचे आहेत.

ज्या त्रिशूरमधून सुरेश गोपी विजयी झाले आहेत, तो मतदारसंघ गेल्या निवडणुकीत काँग्रेसकडे होता. सुरेश गोपी लोकसभा खासदार म्हणून निवडून येण्यापूर्वी राज्यसभेचे खासदारही होते. 2016 मध्ये त्यांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली होती. त्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ 2022 पर्यंत होता.

चित्रपटांमध्ये केल्या आहेत महत्त्वाच्या भूमिका

सुरेश गोपी मूळचे केरळमधील अलाप्पुझा येथील आहेत. त्यांचा जन्म 1958 मध्ये झाला. त्यांनी कोल्लममधून विज्ञान विषयात पदवी घेतली आणि इंग्रजीमध्ये मास्टर्स केले आहे. सुरेश चित्रपटांशीही संबंधित आहेत. त्यांनी बालकलाकार म्हणून चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर अनेक चित्रपटांमध्ये काम केले.

सुरेश गोपी यांनीही अनेक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. 1998 मध्ये आलेल्या कालियाट्टम या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय ते बराच काळ टीव्ही शो होस्ट म्हणून काम करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : अजितदादांचा नादच खुळा! पुण्याच्या गणपती मिरवणुकीत उपमुख्यमंत्र्यांनी वाजवला ढोल; कसबा गणपतीच्या पालखीलाही दिला खांदा

Latest Maharashtra News Updates : किल्ल्यावर तरुणांची हुल्लडबाजी, पंचधातूची तोफ कोसळली

Ganpati Visarjan 2025 Live Updates : गणेश गल्लीतील मुंबईचा राजा लालबागमध्ये पोहोचतोय

Miraj Ganpati Visarjan : मिरजेत गणरायाची बैलगाडीतून विर्सजन मिरवणूक, काय आहे वैशिष्ट्य जाणून घ्या

Shreyas Iyer : श्रेयस अय्यर बनणार टीम इंडियाचा 'कर्णधार'; हालचालींना वेग, लवकरच होणार संघाची घोषणा

SCROLL FOR NEXT