modi yogi.png
modi yogi.png 
देश

Survey: PM मोदींची हवा कायम CM योगी ठरले एक नंबर! निवडणुका झाल्या तर भाजपचाच दिसेल बोलबाला

सकाळ ऑनलाइन टीम

नवी दिल्ली- पुढील लोकसभा निवडणूक होण्यासाठी आणखी मोठा काळ आहे. परंतु, एका सर्व्हेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता अजून कायम आहे. कोरोना आणि सीमेवर चीनबरोबर तणावाची स्थिती असतानाही या सर्व्हेमध्ये देशातील सर्वोत्तम पंतप्रधान म्हणून मोदींचे नाव समोर आले आहे. 'इंडिया टुडे' आणि 'कार्वी इनसाइट्स'च्या मूड ऑफ द नेशन पोलमध्ये ही गोष्ट समोर आली आहे. जर आज निवडणुका झाल्या तर एनडीए पुन्हा एकदा सत्ता काबीज करु शकते.  

या सर्व्हेनुसार 3 जानेवारी ते 13 जानेवारी 2021 दरम्यान देशातील सुमारे 12232 लोकांचे मत जाणून घेण्यात आले. यामध्ये 67 टक्के ग्रामीण तसेच 33 टक्के शहरी लोकसंख्येचा समावेश होता. जर आज निवडणूक झाली तर भाजपच्या नेतृत्त्वाखालील आघाडीला लोकसभेतील 543 जागांपैकी 321 जागा मिळू शकतात. तर काँग्रेसच्या नेतृत्त्वाखाली यूपीएला 93 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर काँग्रेसला केवळ 51 जागांवरच विजय मिळू शकतो. त्याचबरोबर इतरांच्या खात्यात 129 जागा येऊ शकतात. 

या सर्व्हेदरम्यान देशातील सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्रीबाबत जेव्हा लोकांना प्रश्न विचारण्यात आला. त्यामध्ये 25 टक्के लोकांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देशातील सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री ठरले आहेत. तर दुसऱ्या नंबरवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा नंबर येतो. त्यांना 14 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा या यादीत तिसरा नंबर लागतो. त्यांच्या बाजूने 8 टक्के लोकांनी मत दिले आहे. 

मोदी कॅबिनेटमधील सर्वोत्कृष्ट मंत्री
या सर्व्हेमध्ये लोकांना मोदी कॅबिनेटमधील सर्वोत्कृष्ट मंत्रीबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी 39 टक्के लोकांनी अमित शहा यांना सर्वात चांगले मंत्री ठरवले आहे. तर 14 टक्के राजनाथ सिंह यांचा नंबर येतो. तर नितीन गडकरी या यादीत तिसऱ्या नंबरवर आहेत. त्यांना 10 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. तर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनाही लोकांनी पसंती दिली आहे. 8 टक्के लोकांनी त्यांना या यादीत त्यांना चौथ्या नंबरवर ठेवले आहे. 

कोरोना काळात पंतप्रधान मोदी यांनी घेतलेल्या निर्णयांसाठी 23 टक्के लोकांनी त्यांना योग्य ठरवले आहे. तर 50 टक्के लोकांच्या मते या दरम्यान पंतप्रधान मोदींनी चांगले काम केले आहे. तर 18 टक्के लोकांना या काळातील मोदींचे काम साधारण वाटले. त्याचबरोबर 7 टक्के लोकांनी त्यांची कामगिरी खराब असल्याचे मत व्यक्त केले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: प्रादेशिक पक्ष भविष्यात काँग्रेसमध्ये विलिन होणार? शरद पवारांचे मोठे भाकित, राष्ट्रवादी बद्दल देखील दिले संकेत 

Met Gala 2024 : अरबपती सुधा रेड्डीच्या ड्रेसपेक्षा नेकलेसचीच जास्त हवा, 180 कॅरेटच्या डायमंड नेकलेसने सर्वांचंच वेधलं लक्ष

Renuka Shahane : 'मराठी लोकांना कमी लेखणाऱ्यांना मत देऊ नका'; त्या घटनेनंतर रेणुका यांनी व्यक्त केला संताप

मराठा समाजातील NEET परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कुणबी आरक्षण न मिळाल्याने एकाने संपवले जीवन

'7 दिवस पत्नी अन् 7 दिवस प्रेयसीसोबत राहतो'; कराराच्या आधारे कोर्टाने केली आरोपीची सुटका

SCROLL FOR NEXT