देश

Sushma Swaraj: सुषमा स्वराज यांचा 'तो' फोटो ट्विट करत पती कौशल भावूक; लेकीला टॅग करत म्हणाले...

दिवंगत सुषमा स्वराज यांचे पती स्वराज कौशल यांची एक पोस्ट चर्चेत आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा झेंडा अभिमानाने फडकवणाऱ्या देशाच्या माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनाला २ वर्षापेक्षा अधिक काळ लोटला आहे. मात्र, त्यांचे पती स्वराज कौशल यांची एक पोस्ट चर्चेत आली आहे. (Sushma Swaraj husband Swaraj Kaushal shares their last pic together )

नुकतंच स्वराज कौशल यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये तो फोटो आहे जो सुषमा यांच्या मृत्यूपूर्वी दोन दिवसआधी क्लिक केला होता. ट्विटरवर शेअर केलेल्या फोटोमध्ये स्वराज कौशल पत्नी सुषमा स्वराजसोबतफोटोसाठी पोज देताना दिसत आहेत. त्यांच्या ट्विटनुसार, हा फोटो इंडिया इंटरनॅशनल सेंटरमध्ये क्लिक करण्यात आला आहे.

हेही वाचा - योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त

कौशल यांनी त्यांची मुलगी बंसुरी स्वराजला टॅग करत भावूक झाले आहेत. , "आमचा अखेरचा एकत्र फोटो... हा फोटो माझा मित्र शाहिद सिद्दीकी याने 6 ऑगस्ट 2019 रोजी त्यांचे निधन होण्याच्या एक-दोन दिवस आधी इंडिया इंटरनॅशनल सेंटरमध्ये काढला होता." असे कौशल यांनी कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

सुषमा स्वराज यांचे ६ ऑगस्ट २०१९ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. हजारो लोकांनी पूर्ण राज्य सन्मानाने त्यांना अखेरचा निरोप दिला. त्यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. अमोघ वक्तृत्व आणि प्रशासन कौशल्याच्या बळावर सुषमा स्वराज यांनी राजकीय कारकीर्दीत अनेक जबाबदाऱ्या समर्थपणे हाताळल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT