Swami Prasad Maurya Team eSakal
देश

मी ज्यांची साथ सोडली ते संपले; 'सायकल'वर बसलेल्या स्वामी प्रसाद मौर्यांचा घणाघात

भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या मौर्या यांनी आज समाजवादी पक्षामध्ये प्रवेश केला आहे.

सुधीर काकडे

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) सरकारमधील कामगार मंत्री पदाचा राजीनामा देणारे स्वामी प्रसाद मौर्य यांनी आज समाजवादी पक्षात प्रवेश केला. एवढंच नाही तर यावेळी त्यांनी जोरदार फटकेबाजी करत एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केला. मौर्य यांनी भाजपसोबतच (BJP) बसपावरही जोरदार टीका केली आहे. कधीकाळी ते मायावतींच्या जवळच्या नेत्यांपैकी एक होते, स्वामी प्रसाद मौर्य म्हणाले, 'आम्ही ज्यांची साथ सोडतो, नंतर ते कुठेच उरत नाही. त्याचं जिवंत उदाहरण मायावती आहेत.

आंबेडकरांच्या कार्यातून मायावतींनी माघार घेतली. मान्यवर कांशीराम यांनी डोळे मिटताच त्यांच्या घोषणा बदलण्यात आल्या. 'जिसकी जितनी भागीदारी, उसकी उतनी हिस्सेदारी' हा नारा बदलून 'जिसकी जितनी तैयारी, उसकी उतनी भागीदारी' असा केला.राजीनाम्यांमुळे भाजप नेत्यांची झोप उडाली...

स्वामी प्रसाद मौर्य म्हणाले की, आज भारतीय जनता पक्षाचे जे बडे नेते कुंभकर्णी झोपेत होते, त्यांची झोप आमच्या राजीनाम्याने उडाली आहे. भाजपचे काही लोक म्हणतात की, 5 वर्षे राजीनामा का दिला नाही. मुलाच्या हितासाठी भाजप सोडल्याचेही काही बेईमान लोक सांगतात. अशा लोकांना मी सांगू इच्छितो की, भाजपच्या लोकांनी या देशातील गरीब, दलित, मागासलेल्या, अल्पसंख्याकांच्या डोळ्यात धूळफेक करून सत्ता बळकावली. इतकंच नाही तर मागासलेल्या समाजाचा नेता म्हणून स्वत:ला प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणारे स्वामी म्हणाले, 'मी पक्ष काढला नसला तरी मी कोणत्याही पक्षापेक्षा कमी नाही.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची बैठक, कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट फॅक्टरवर होणार निर्णायक चर्चा ?

नीलेश लंकेंनी न्यायालयीन लढाईसुद्धा जिंकली, सुजय विखे पाटलांना दणका

Pimpri News : हक्काच्या घराचे स्वप्न उद्योगनगरीत पूर्ण; ‘पीएमआरडीए’मुळे एक हजार कुटुंबांना घरकुल

Beed News: इकडे आड, तिकडे विहीर; अनेक रस्त्यांवर ब्लॅकस्पॉट; विहिरी ठरतात अपघातांचे कारण

Chhatrapati Sambhajinagar: गंगापूरमध्ये मोकळ्या कांद्याचा लिलाव सुरू; बाजार समितीतर्फे पहिल्याच दिवशी १२५० रुपये उच्चांकी दर

SCROLL FOR NEXT