tablighi jamaat event caused coronavirus to spread to many persons says central government 
देश

'तबलिगींच्या कार्यक्रमामुळे झाला अनेकांना कोरोना'

वृत्तसंस्था

नवी दिल्लीः दिल्लीतील निझामुद्दीन भागात मार्च महिन्यामध्ये तबलिगी जमातने धार्मिक मेळाव्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने नागरिक एकत्र आले होते. त्यामुळे करोनाच्या विषाणूंच्या फैलाव झाला आहे, असे केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. कृष्ण रेड्डी यांनी आज (सोमवार) राज्यसभेत सांगितले.

केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. कृष्ण रेड्डी राज्यसभेत लिखित उत्तर देताना म्हणाले, 'दिल्ली पोलिसांनी २३३ तबलिगी जमातीच्या सदस्यांना अटक केली आणि २९ मार्चपर्यंत २,३६१ नागरिकांना संघटनेच्या मुख्यालयातून बाहेर काढण्यात आले आहे. तबलिगी जमातीचा प्रमुख मौलाना मोहम्मद साद याची सध्या चौकशी सुरु आहे.”

दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, 'कोविड-१९ च्या उद्रेकाच्या अनुषंगाने विविध प्राधिकरणांनी मार्गदर्शक सूचना व आदेश जारी केलेले असतानाही दीर्घ कालावधीसाठी फिजिकल डिस्टंसिंग न पाळता मास्क आणि सॅनिटायझरची तरतुद न करता बंद जागेत एक मोठा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यामुळेच हा मेळावा अनेकांमध्ये कोरोना विषाणूच्या फैलावाला कारणीभूत ठरला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT