India and China Sakal
देश

सीमावादावर चीनशी उद्या चर्चा

भारत आणि चीन यांच्यात लष्करी पातळीवरील वाटाघाटींची १४ वी फेरी होणार

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : भारत आणि चीन(China) यांच्यात बुधवारी (ता. १२) लष्करी पातळीवरील वाटाघाटींची १४ वी फेरी होणार आहे. लडाख (Ladakh)सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांकडून सीमावादावर (border dispute)घडलेल्या शाब्दिक चकमकींनंतर यातून ठोस तोडगा निघेल अशी अपेक्षा लष्कराच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे.

ताबारेषेवर चुशूल मोल्डो क्षेत्रात चीनी हद्दीमध्ये दोन्ही देशांचे लष्करी अधिकारी बुधवारी चर्चा करतील. पूर्व लडाखमधील तणाव बिंदूंवरून विशेषतः गोग्रा आणि हॉटस्प्रिंग या भागांतून चीनने सैन्य मागे घ्यावे यावर भारत ठाम असून बुधवारच्या वाटाघाटींमध्ये हा मुद्दा भारताकडून ठामपणे मांडला जाईल. यासोबतच, देप्सांग आणि देम्चोक यासह अरुणाचल प्रदेशपर्यंतच्या संपूर्ण सीमेवर वाढलेला कमी करण्यासाठीही सांगितले जाईल. सैन्य मागे घेणे ही चीनची जबाबदारी असल्याचे भारताकडून वारंवार सांगितले जात असून सीमेवरील शांतता आणि सलोख्यासाठी चीनकडून शांतता करारांचे पालन होणे आवश्यक असल्याचेही भारताकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

चीनने सीमेवर सैन्याची जमवाजमव करून तणाव वाढविल्याने भारतानेही ५० हजारांहून जास्त सैन्य ताबारेषेवर सज्ज ठेवले आहे. सैन्यमाघारीबाबत चीनच्या आडमुठेपणामुळे मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या १३ व्या फेरीच्या चर्चेतून काहीही ठोस निष्पन्न निघू शकले नव्हते.

वर्षारंभीच डिवचले

नव्या वर्षाच्या प्रारंभी गलवान खोऱ्यात चीनी सैनिक झेंडा फडकावत असल्याचा व्हिडिओ जारी करून त्याचप्रमाणे अरुणाचल प्रदेशातील भागांची चिनी भाषेतील नावे जाहीर करून भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला. तर भारतानेही प्रत्युत्तर देताना, अरुणाचल हा भारताचा भाग असून असे नावे बदलण्याने काहीही होणार नाही असे सुनावले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Passport Ranking : भारतीय 'पासपोर्ट रँकिंग'मध्ये मोठी सुधारणा!, आता ५६ देशांमध्ये 'Visa-Free' एन्ट्री करता येणार

USA vs NED : अमेरिकेच्या विजयात पुणे, मुंबईचे खेळाडू चमकले; नेदरलँड्सचा पराभव पाकिस्तानच्या पथ्यावर, अ गटाचे चित्र स्पष्ट

अभ्यास करा..! पाचवी अन्‌ आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा २२ फेब्रुवारीला; परीक्षेत दोन पेपर, १५० गुणांचा वस्तुनिष्ठ प्रश्न, वाचा...

DGCA Action on Air India : 'एअर इंडिया'ला मोठा झटका!, 'डीजीसीए'ने ठोठावला १ कोटी रुपयांचा दंड

‘एक्साईज’ची मोठी कारवाई! बनावट विदेशी दारू विकणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद! म्होरक्या बीड जिल्ह्यातील ‘या’ गावचा; लातूर, सोलापूरचेही कनेक्शन, वाचा...

SCROLL FOR NEXT