A newly married couple was gifted bottles of petrol and diesel by their friends
A newly married couple was gifted bottles of petrol and diesel by their friends sakal
देश

नवविवाहित जोडप्याला 'जळजळीत' भेट.. लग्नात एकच हवा!

सकाळ डिजिटल टीम

सध्या देशात पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले आहे. पेट्रोलच्या डिझेलच्या किंमती दरदिवशी उच्चांक गाठत आहे त्यामुळे सामान्यांच्या खिशाला याची मोठी झळ बसत आहे.अशातच जीवनावश्यक वस्तु म्हणून समजले जाणारे पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढल्याने त्याचे महत्त्वही तितकेत वाढले आहे. वाढत्या पेट्रोल डिझेलच्या किंमती पाहून तामिळनाडू राज्यातील एका नवविवाहित जोडप्याला लग्न संमारंभात त्यांच्या मित्रांनी पेट्रोल आणि डिझेलच्या बाटल्या भेट दिल्या.या संदर्सभात एक फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. (A newly married couple was gifted bottles of petrol and diesel by their friends)

तामिळनाडू राज्यातील चेंगलपट्टू जिल्ह्यात असलेल्या चेयुर गावात एका लग्नसंमारंभातील हा फोटो आहे. या फोटोवर नेटकऱ्यांच्या अनेक प्रतिक्रिया उमटत आहे.

सध्या तमिळनाडू राज्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर 110.85 रुपये आणि 100.94 रुपये प्रति लिटर आहेत. राज्यातील वाढत्या पेट्रोल डिझेलच्या दरावरुन मित्रांनी नवविवाहित जोडप्याला चक्क लग्न संमारंभात पेट्रोल आणि डिझेलच्या बाटल्या भेट दिल्याने हा चर्चेचा विषय ठरलाय.

भारतात पेट्रोल व डिझेलच्या किमती आकाशाला भिडल्या आहेत. सरकारी पेट्रोल कंपन्यांनी २२ मार्चपासून आतापर्यंत १५ वेळा इंधनाच्या दरात वाढ केली आहे. आपले शेजारी व सध्या राजकीय व आर्थिक संकटाला सामोरे जाणाऱ्या पाकिस्तानश्रीलंकेत पेट्रोल भारतापेक्षा स्वस्त आहे. भारतात पेट्रोलने यापूर्वी शतकी आकडा गाठलेला असून आता दर १२० रुपयांपेक्षाही जास्त आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT