A-Raja-and-Palaniswami
A-Raja-and-Palaniswami 
देश

ए. राजा यांनी मुख्यमंत्री पलानीस्वामी यांची मागितली माफी

पीटीआय

चेन्नई - तमिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांच्यावर केलेल्या अपमानास्पद टिपणीवरुन द्रमुकचे नेते ए. राजा यांनी त्यांची माफी मागितली. राजा यांच्या टिपणीने मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते. विविध पक्षांच्या नेत्यांनीही याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर सोमवारी राजा यांनी पलानीस्वामी यांची माफी मागितली.

गेल्या आठवड्यात प्रचारादरम्यान ए. राजा म्हणाले होते की, द्रमुकचे अध्यक्ष स्टॅलिन आणि  इडाप्पडी के. पलानीस्वामी यांची तुलना करू. स्टॅलिन हे गेल्या २३ वर्षांत ‘मिसा’ कायद्याअंतर्गत तुरुंगात गेले होते. त्यांनी पक्षाचे जिल्हा चिटणीस, कार्यकारी समिती सदस्य, युवा विभागाचे चिटणीस, खजिनदारपदी काम केले. त्यानंतर कार्यकारी अध्यक्ष व आता द्रमुकचे अध्यक्षपदाची धुरा स्टॅलिन सांभाळत आहेत. नेते म्हणून त्यांची  टप्प्याटप्प्याने जडणघडण झाली. याचमुळे अधिकृत विवाहातून त्यांचा जन्म झाला, असे मी सांगू शकतो. उलट जयललिता यांच्या मृत्यूपर्यंत इडाप्पडी पलानीस्वामी यांचे नाव कोणालाही माहीत नव्हते आणि सार्वजनिक जीवनातही ते फारसे परिचित नव्हते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

म्हणजेच पलानीस्वामी हे राजकारणातील अवैध संबंधांमधून अकाली जन्मलेले बाळ आहे, अशी बोचरी टीका केली होती. पलानीस्वामी यांची किंमत स्टॅलिन यांच्या चपलेएवढीही नाही, असेही त्यांनी म्हटले होते. ए. राजा यांची ही विधाने व्हायरल झाल्यानंतर सर्व थरांतून त्यांच्यावर टीका होऊ लागली होती. त्यामुळे राजा यांच्यावर पत्रकार परिषद घेऊन माफी मागण्याची वेळ आली.

प्रत्येक मातेचा अपमान 
राजा यांनी केलेली टीका पलानीस्वामी यांना जिव्हारी लागली होती. 
ते खूप भावूक झाले होते. थाउजंड लाइट्स मतदारसंघात प्रचार करताना ते म्हणाले की जर अशा पद्धतीने मुख्यमंत्र्यांचा अनादर होत असेल तर असे लोक सत्तेवर आल्यावर सामान्य माणसांबाबत काय होईल, याचा विचार करा. ही टीप्पणी म्हणजे केवळ माझ्या आईचाच नव्हे तर प्रत्येक मातेचा अपमान आहे. जे लोक महिलांबद्दल असभ्य भाषेत बोलतात, त्यांना धडा शिकवायलाच हवा.

नेत्यांच्या सार्वजनिक जीवनाची तुलना
या घटनेनंतर ए. राजा यांनी आज पत्रकार परिषद घेऊन दिलगिरी व्यक्त केली. ते म्हणले की, माझ्या विधानामुळे तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना खूप दुःख झाले, याचा मला खेद वाटत आहे. माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ लावल्याने मला पश्‍चात्ताप होत आहे. जर खरेच त्यांनी वेदना झाल्या असतील तर राजकारण बाजूला ठेवून मी पलानीस्वामी यांची माफी मागतो. असे करण्यात मला काहीही संकोच वाटत नाही. दोन्ही नेत्यांच्या खासगी आयुष्याची तुलना करण्याचा माझा कोणताही उद्देश नव्हता नव्हे तर भाषणात त्यांच्या सार्वजनिक जीवनाची तुलना मी केली होती.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: अजित पवार अन् शरद पवार लग्न सोहळ्यानिमित्त एकत्र

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : राजस्थान क्वालिफाय करणार की हैदराबाद मजबूत स्थितीत पोहचणार?

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

SCROLL FOR NEXT