Crime News Sakal
देश

Acid Attack : पाठलाग करत कोर्टात पतीनं पत्नीवर फेकलं अॅसिड; हल्ल्यात महिला वकीलही होरपळली

तामिळनाडूच्या कोईम्बतूर न्यायालयात गुरुवारी एका व्यक्तीनं आपल्या पत्नीवर अॅसिड फेकल्यामुळं मोठी खळबळ उडाली.

सकाळ डिजिटल टीम

शिवानं पाण्याच्या बाटलीत ठेवलेलं अॅसिड कवितावर ओतलं. कविता वेदनेनं ओरडू लागली. ती खाली जमिनीवर कोसळली.

Tamil Nadu News : तामिळनाडूच्या कोईम्बतूर न्यायालयात गुरुवारी एका व्यक्तीनं आपल्या पत्नीवर अॅसिड फेकल्यामुळं मोठी खळबळ उडाली. या अॅसिड हल्ल्यात महिलेसोबत एक वकीलही भाजली आहे.

ही घटना घडल्यानंतर आरोपी पळू लागला. मात्र, वकिलांनी त्याला पकडलं आणि त्याला मारहाण करुन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. ही महिला एका खटल्यात न्यायालयात हजर राहण्यासाठी आली होती. ती जवळपास 80 टक्के भाजली आहे. सहा वर्षांपूर्वी चोरीच्या गुन्ह्यात महिलेला पकडलं होतं.

कोईम्बतूरच्या रामनाथपुरममधील कावेरी नगर येथील कविता (33) हिला 2016 मध्ये बस प्रवाशाकडून 10 तोळे सोन्याची चेन चोरल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. या दिवसांत ती जामिनावर बाहेर होती. पण, प्रकरण कोर्टात असल्यामुळं ती ठरलेल्या तारखेला सुनावणीला हजर राहायची.

कोर्टाच्या कॉरिडॉरमध्ये नवरा-बायकोमध्ये वाद

गुरुवारी कविता याच खटल्याच्या सुनावणीसाठी न्यायदंडाधिकारी द्वितीय न्यायालयात जात होती. तिचा नवरा शिव तिचा पाठलाग करत होता. कोर्टाच्या कॉरिडॉरमध्ये आल्यानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाला. शिव तिला परत घरी घेऊन जाण्यासाठी तिथं आला होतो, पण कवितानं माघारी येण्यास नकार दिला.

महिला वकिलाचा कविताला वाचवण्याचा प्रयत्न

त्यानंतर शिवानं पाण्याच्या बाटलीत ठेवलेलं अॅसिड कवितावर ओतलं. कविता वेदनेनं ओरडू लागली. ती खाली जमिनीवर कोसळली. हे पाहून शेजारी उभ्या असलेल्या महिला वकिलानं तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तीही त्यात भाजली. घाईघाईत दोघांनाही कोईम्बतूर मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं.

कविताला मानेच्या खाली गंभीर जखम

त्याचवेळी इतर वकिलांनी पळून जाणाऱ्या शिवाला पकडलं. त्याला जबर मारहाण करण्यात आली. यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. कविता मानेच्या खाली गंभीररित्या भाजली असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. ती 80 टक्के भाजल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. तिची प्रकृती चिंताजनक आहे.

कवितावर अवैध संबंधाचा आरोप

आरोपी शिवकुमार उर्फ ​​शिवा हा लॉरी चालक आहे. त्याला दोन मुलंही आहेत. पण, कविता आपल्या मुलांपासून आणि पतीपासून विभक्त राहते. कविताचं एका व्यक्तीसोबत अवैध संबंध असल्याचा आरोप आहे. यावरून दोघांमध्ये पूर्वीपासून वाद सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugarcane Crushing Season : १५ ऑक्टोबरपासूनचा गाळप हंगामाचा निर्णय रद्द करावा; विविध संघटनांची साखर आयुक्तांकडे मागणी

Kokan Railway : पाच वर्षांत कोकण रेल्वेवर रोज १०० हून अधिक गाड्या; दुपदरीकरणाला वेग, २२ सप्टेंबरला कोकण रेल्वे होणार कर्जमुक्त

Mumbai High Court : घटस्फोटाच्या निकालाला स्थगिती असताना पत्नीला घराबाहेर काढता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश

सिनेसृष्टीला धक्का! 'वेलकम' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५६व्या वर्षी निधन; 15 दिवसांपासून होते इस्पितळात

Nagpur News : आई-बाबा मला माफ करा; तरुण अधिवक्‍त्याने गळफास घेऊन संपविले जीवन

SCROLL FOR NEXT