tamil nadu prime minister narendra modi holds a roadshow after arriving in chennai  
देश

चेन्नईत PM मोदींकडून 31 हजार कोटींच्या प्रकल्पांचा शुभारंभ

सकाळ डिजिटल टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी संध्याकाळी चेन्नईला पोहोचले दरम्यान पंतप्रधानांनी येथील जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियममध्ये 31,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विकासकामांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. या प्रकल्पांमध्ये रेल्वे, पेट्रोलियम, गृहनिर्माण आणि रस्ते यासारख्या प्रमुख पायाभूत सुविधा क्षेत्रांचा समावेश आहे.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, हे ठिकाण खास असून येथील लोक, येथील संस्कृती आणि भाषा अप्रतिम आहे. अगदी अलीकडे, मी माझ्या निवासस्थानी भारतीय मूकबधिर ऑलिम्पिक संघाला आमंत्रित केले होते. तुम्हाला माहिती असेल की, यावेळी भारताने स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी केली होती, परंतु आपण जिंकलेल्या 16 पदकांपैकी 6 पदके तामिळनाडूच्या तरुणांनी जिंकली आहेत, असे मोदी म्हणाले.

31,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांचे उद्घाटन किंवा पायाभरणी करत तामिळनाडूचा विकास यात्रा साजरा करण्यासाठी आपण येथे जमलो आहोत. ज्यामध्ये रस्तेबांधणीच्या क्षेत्रात फोकस स्पष्टपणे दिसून येतो. मी त्या सर्वांचे अभिनंदन करू इच्छितो ज्यांना पीएम आवास योजनेअंतर्गत ऐतिहासिक चेन्नई लाइट हाऊस प्रकल्पांतर्गत घर मिळेल. आमच्यासाठी हा एक अतिशय समाधानकारक प्रकल्प आहे.

ते म्हणाले की, मला विशेष आनंद होत आहे की पाच रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास होत आहे. भविष्यातील गरजा लक्षात घेऊन हे आधुनिकीकरण आणि भविष्यातील विकास पाहूण करण्यात येत आहे. मल्टी-मॉडल लॉजिस्टिक पार्क हे आपल्या देशातील मालवाहतुकीच्या इकोसिस्टममध्ये एक आदर्श बदल असेल. विविध क्षेत्रातील यापैकी प्रत्येक प्रकल्प रोजगार निर्मिती आणि स्वावलंबी होण्याच्या आमच्या संकल्पाला चालना देईल, असे मोदी म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले की आमचे सरकार मोठ्या योजनांमध्ये पूर्णता (100% कव्हरेज) मिळविण्यासाठी काम करत आहे. कोणतेही क्षेत्र घ्या- शौचालये, गृहनिर्माण, आर्थिक समावेश... आम्ही परिपूर्णतेच्या दिशेने काम करत आहोत (100% कव्हरेज). काही वर्षांपूर्वी रस्ते, वीज, पाणी अशा पायाभूत सुविधांबाबत बोलले जात होते. आज आम्ही भारताच्या गॅस पाइपलाइन नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी काम करत आहोत. आय-वेवर काम सुरू आहे, प्रत्येक गावात हायस्पीड इंटरनेट पोहोचवण्याचे आमचे ध्येय आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat: ७५ वर्षांसंबंधीचं 'ते' विधान भागवतांनी नेमकं का केलं? संघाकडून स्पष्टीकरण, विरोधकांचा मोदींवर रोख

Manchar News : काय सांगता! वृद्ध महिलेचे घरच गेले ‘चोरीला’; न्यायासाठी धावपळ सुरू

Latest Marathi News Updates : नाशिक जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलंबित

Palghar News: वसई-विरारमध्ये नालासोपाऱ्यात अमली पदार्थांचा पर्दाफाश, 12 आरोपी अटक

IND vs ENG 3rd Test: 'चेंडू'वरून रामायण! शुभमन गिलचं वाद घालणं चुकीचं नव्हतं; अम्पायरने काय केले, ते वाचाच...

SCROLL FOR NEXT