Tamil Nadu Accident esakal
देश

Accident News : महामार्गावर भीषण अपघात; 6 वाहनं एकमेकांवर आदळली, एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू

अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

कुड्डालोर : तामिळनाडूतून (Tamil Nadu Accident) अपघाताची एक मोठी बातमी समोर येत आहे. आज (मंगळवार) पहाटे त्रिची-चेन्नई राष्ट्रीय महामार्गावर सहा वाहनं एकमेकांवर आदळली आणि या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला.

या दुर्घटनेत कुड्डालोर जिल्ह्यातील वेयपूर जवळ राष्ट्रीय महामार्गावर (National Highway) 2 खासगी बस, 2 लॉरी आणि 2 कार एकमेकांवर आदळल्या. एएनआयनं दिलेल्या माहितीनुसार, दुर्घटनेत 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. चालकासह एकाच कुटुंबातील 2 महिला आणि 2 मुलांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे.

पोलिसांनी सांगितलं की, मृत कुटुंबातील सदस्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. घटनेची माहिती मिळताच, पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं. बऱ्याच प्रयत्नांनंतर मृतांचे मृतदेह बाहेर काढून पोस्टमॉर्टमसाठी वेयपूर शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. या अपघातप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अपघातात सहभागी असलेले लोक कोणत्या शहरातील आहेत, याचा कसून तपास पोलीस करत आहेत. अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT