woman who became a 'man' for her daughter
woman who became a 'man' for her daughter Sakal
देश

नवऱ्याच्या मृत्यूनंतर झाला छळ; मुलीसाठी 36 वर्षे 'पुरुष' म्हणून काढली

दत्ता लवांडे

चेन्नई : आयुष्यातील एखाद्या प्रसंगामुळे एखाद्याला कोणत्या संकटाचा सामना करावा लागू शकतो हे आपण सांगू शकत नाही. आपल्या आयुष्यात संघर्ष करून यश मिळवलेले खूपजण आपण पाहिले असतील. असाच एक संघर्षमय प्रवास तामिळनाडूतील एका ५७ वर्षाच्या महिलेने केला आहे. पुरुषांच्या छळापासून वाचण्यासाठी आणि आपल्या मुलीला वाढवण्यासाठी पुरुषाचा वेष धारण करून एका महिलेने ३६ वर्षे घालवली आहेत. पेटचीम्मल असं या महिलेच नाव असून तामिळनाडूतील कट्टुनायकनपट्टी गावातील ती रहिवाशी आहे. आपल्या लहान मुलीला सुरक्षितरित्या वाढवण्यासाठी तिने हा निर्णय घेतला असल्याचं तिने सांगितलं.

(Tamilnadu Woman Who Became a 'MAN' For Her Daughter For 36 Year)

न्यु इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, पेटचीम्मल या महिलेचं शिवा नावाच्या एका पुरुषासोबत लग्न झालं होतं. त्यावेळी ती फक्त २० वर्षाची होती. लग्न झाल्यानंतर पंधरा दिवसांतच तिच्या पतीचा मृत्यू झाला. त्यानंतर तिच्या आयुष्यातील संघर्षमय काळाला सुरुवात झाली. तिच्या पतीच्या मृत्यूनंतर तीला खूप संकटांना सामोरं जावं लागलं होतं. पतीच्या मृत्यूच्या वेळी ती गरोदर होती. त्यानंतर तीने शान्मुगसुंदरी या मुलीला जन्म दिला. पण पुढे मुलीला वाढवण्यासाठी तिला खूप संघर्ष करावा लागला. तिने बांधकामाच्या साईट, हॉटेल अशा ठिकाणी कामं केले आणि आयुष्यात कुठलीही अडचण आली तरी परत लग्न न करण्याचा निर्णय घेतला.

आपल्या मुलीला वाढवण्यासाठी तिला वेगवेगळ्या ठिकाणी काम करावं लागत होतं. त्या ठिकाणी तिचा पुरुषांकडून लैंगिक छळ होत असायचा. काही महिने तिने हा छळ सहन केला आणि नंतर वेशांतर करून पुरुषांसारखं राहण्याचा निर्णय घेतला. तिने शर्ट आणि लुंगी घालायला सुरूवात केली आणि आपलं नाव बदलून "मुथ्थू" असं ठेवलं. यानंतरच्या ३६ वर्षे ती पुरुष म्हणून राहिली आणि आपला संघर्षमय प्रवास करत राहिली. "आम्ही २० वर्षापूर्वी कट्टुनायकनपट्टी येथे स्थायिक झालो होतो. माझ्या मुलीला आणि जवळच्या नातेवाईकांनाच माझ्या वेशांतराबद्दलची ही गोष्ट माहिती होती." असं पेटचीम्मलने न्यु इंडियन एक्सप्रेसला बोलताना सांगितलं.

पेटचीम्मल आता ५७ वर्षे वयाची आहे. तिची मुलगी शान्मुगासुंदरी हीचा विवाह झाला असून तिच्या घरची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. पण पेटचीम्मल आता तिची ओळख बदलायला तयार नाही. "ज्या वेशांतराने ज्या माझ्या मुलीच्या चांगल्या आयुष्याचा मार्ग दाखवला ती माझी ओळख मी बदलणार नाही. माझी ओळख 'मुथ्थूट म्हणूनच राहील." असं ती बोलताना म्हणाली.

तिने आपल्या महिलेच्या ओळखीच्या आधारे MGNREGS चे जॉब कार्ड मिळवले आहे पण तिचे आधार कार्ड, रेशनकार्ड आणि मतदार ओळखपत्रानुसार ती अजूनही पुरुषच आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

काँग्रेसला मोठा धक्का! दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षाने दिला पदाचा राजीनामा, सांगितलं कारण

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे मोदींपेक्षा मोठे नेते, छगन भुजबळांचा टोला

SCROLL FOR NEXT