Air India-TaTa group 
देश

एअर इंडियाची पुन्हा टाटांकडे घरवापसी; शंभर टक्के समभागांचं हस्तांतरण पूर्ण

तब्बल ६९ वर्षांनंतर एअर इंडियाची मालकी आता पुन्हा टाटांकडे आली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : एअर इंडियाचा (Air India) धोरणात्मक निर्गुंतवणूक व्यवहार आज पूर्ण झाला. एअर इंडियाची पुन्हा टाटांकडे घरवापसी झाली आहे. या व्यवहारात एअर इंडियाचे १०० टक्के समभाग व्यवस्थापन नियंत्रणासह टॅलेस प्रायव्हेट लिमिटेडकडे (Talace Pvt Ltd) यशस्वीरित्या हस्तांतरीत करण्यात आले आहेत. यानंतर आता नवी संचालक मंडळ एअर इंडियाचा कार्यभार स्विकारेल, अशी माहिती गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाच्या सचिवांनी दिली. (Tata Group gets official handover of Air India today)

य़ा संपूर्ण हस्तांतरण व्यवहारापूर्वी टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यानंतर ते थेट नवी दिल्लीतील एअर इंडियाच्या कार्यालयात गेले. याचाच परिणाम म्हणून देशातील सर्वात मोठ्या स्टेट बँकेनं एअर इंडियाला भांडवल उभ करण्यास तसेच कर्जे देण्याची तयारी दर्शवली आहे.

दरम्यान, आजच्या या व्यवहारापूर्वी गुरुवारी मुंबईवरुन उड्डाण केलेल्या चार फ्लाईट्समध्ये उन्नत भोजन सेवा सुरु करुन एअर इंडियामध्ये आपलं पहिलं पाऊल ठेवलं. AI864 (मुंबई-दिल्ली), AI687 (मुंबई-दिल्ली), AI945 (मुंबई-अबुधाबी), AI639 (मुंबई-बंगळुरु) या चार फ्लाईट्समध्ये 'उन्नत भोजन सेवा' उपलब्ध करुन देण्यात आली. फ्लाईटमधील नव्या सेवांबाबत टाटा समूहाकडून केबिन क्रू सदस्यांना अधिकृत माहितीचे ई-मेलही पाठवण्यात आले आहेत. येत्या काही दिवसात एअर इंडियाची विमानं टाटा समूहाच्या नावानं उड्डाण करतील.

नियोजनबद्ध पद्धतीनं सुरु होणार सेवा

सरकारने ऑक्शन प्रक्रियेनंतर आठ ऑक्टोबर रोजी १८,००० कोटी रुपयांना एअर इंडियाच्या टॅलेस प्रायव्हेट लिमिटेडला विकले होते. ही कंपनी टाटा समूहाच्या मालकीची एक कंपनी आहे. पण कोणत्या दिवसापासून एअर इंडियाची विमानं टाटा समूहाच्या बॅनरखाली उड्डाण करतील याची माहिती नंतर देण्यात येईल. तसेच टाटा समूहाच्या अधिकाऱ्यांकडून तयार करण्यात आलेली 'उन्नत भोजन सेवा' नियोजनबद्ध पद्धतीनं विमानांमध्ये सुरु करण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Highway Parking Rule: महत्त्वाची बातमी! महामार्गावरील पार्किंग नियमांमध्ये मोठे बदल; वाहनांसाठी नवीन दर निश्चित

Safe Investment : FD-RD, म्युच्युअल फंड्स की सोनं? कुठे किती नफा, कुठे किती धोका? गुंतवणूक करण्याआधी हे गणित नक्की समजून घ्या!

रिलीजला महिना झाला अन् शशांक आणि सायली संजीवच्या कैरी सिनेमाची ओटीटीवर होणार एंट्री ! कधी आणि कुठे पाहाल ?

आता फ्लिपकार्टवरून खरेदी करता येणार गाडी; Suzuki e-Access ची धमाकेदार एन्ट्री, 95 किमी रेंजसह परवडणारी किंमत

Amravati Municipal Election 2026 : अमरावतीत 'या' तीन प्रभागात चुरशीची लढत, आमदार राणांसह मुख्यमंत्री फडणवीसांसाठी वर्चस्वाची लढाई

SCROLL FOR NEXT