Tata First Soap  Sakal
देश

Tata Soap: टाटांचं नाव आणि विश्वास; मग तरीही का टिकू शकला नाही देशातला पहिला साबण

आज जरी तो भारतीय बाजारपेठेतून गायब झाला असला तरी टाटा हा देशातला पहिला स्वदेशी साबण ठरला.

वैष्णवी कारंजकर

जो 'ओके' साबणाने आंघोळ करतो, तो कमळासारखा फुलतो... ओके, आंघोळीसाठी उत्तम साबण.' कदाचित तुमच्यापैकी फार कमी लोकांनी ही धून ऐकली असेल, पण एक वेळ अशी होती की अगदी लहान मुलांनाही या धूनबद्दल माहिती होती. आज जरी तो भारतीय बाजारपेठेतून गायब झाला असला तरी टाटा हा देशातला पहिला स्वदेशी साबण ठरला.

या साबणाने ब्रिटीशांच्या ताब्यातल्या भारताच्या स्वातंत्र्याचा पहिला किरण पाहिला आहे. टाटासारख्या मोठ्या ब्रँडचे नाव त्याच्याशी जोडलं गेलं होतं, जरी ते टाटाच्या इतर कंपन्या आणि ब्रँडसारखे आश्चर्यकारक दाखवू शकले नाहीत. आज देशातल्या पहिल्या स्वदेशी आंघोळीच्या साबणाची गोष्ट जाणून घेऊया...

१९३० मध्ये टाटांनी देशाला पहिला स्वदेशी साबण दिला. जमशेदजी टाटा यांनी १९१८ साली कोची इथं टाटा ऑइल मिल्स कारखाना सुरू केला. या कारखान्यात १९३० साली टाटांनी देशातला पहिला साबण बनवला आणि बाजारात आणला. साबणाचं नाव होतं 'ओके'. त्या काळी लोक आंघोळीसाठी साबण आणि शॅम्पूचा वापर फार कमी करत. ज्या काळात देशावर परदेशी कंपन्यांचे वर्चस्व होते, त्या काळात टाटांनी देशाला पहिला साबण दिला.

साबणाचा आकार इतर साबणांपेक्षा खूप मोठा होता. त्यात एक विशेष प्रकारचा सुगंध मिसळला होता. या साबणाने आंघोळ केल्यानं सुगंध आजूबाजूला पसरत असे, पण या साबणासमोर अनेक आव्हानं होती. बाजारात अनेक ब्रँड्स आधीच उपलब्ध होते. अशा परिस्थितीत ओके लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी टाटांनी जाहिरातींचा आग्रह धरला. टाटांनी जबरदस्त मार्केटिंग प्लॅनिंग करत वर्तमानपत्रात, रेडिओवर साबणाची जाहिरात केली. ओके साबण आकाराने खूप मोठा होता, म्हणून त्याच्या नावाशी टॅगलाइन जोडली गेली – “नहाने का सबसे बडा साबून”.

ओके सोपचं ब्रँडिंग चांगलं होतं. देशातील पहिला स्वदेशी ब्रँड असलेल्या ओकेशी टाटाचं नाव जोडलं गेलं, परंतु तरीही हा साबण बाजारात टिकू शकला नाही. यामागे अनेक कारणे होती. त्या काळात लोक साबण फार कमी वापरत. त्याच वेळी, Lifebuoy आधीच बाजारात उपस्थित होते, जे किमतीच्या बाबतीत ओके पेक्षा खूपच किफायतशीर होते. ओके या साबणाने खडतर झुंज दिली. ओकेने लोकांचं लक्ष वेधून घेतलं, परंतु लोकांच्या घरात ते आपले स्थान निर्माण करू शकले नाही आणि काही वेळातच हा साबण बाजारातून गायब झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर काय होती राज ठाकरेंची प्रतिक्रिया? अमित ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करत सगळंच सांगितलं...

Pune Youth Murder in College Campus : पुण्यात खळबळ!, सिंहगड कॉलेज परिसरात भरदिवसा तरूणाची कोयत्याने वार करून हत्या

Sheikh Hasina: शेख हसीना यांना फाशीची शिक्षा; भारत आता त्यांना परत बांगलादेशात पाठवणार का? जाणून घ्या नियम...

Latest Marathi Breaking News:आदित्य ठाकरेंनी ट्विट करत केलं अमित ठाकरेंचं समर्थन

Kolhapur News: गोकुळच्या लिंगनूर कार्यक्रमात ‘लाडकी बहीण’ वरुन रंगले कलगीतुरे

SCROLL FOR NEXT