Tauqeer Raza esakal
देश

..तर मुस्लिमांना कोणीही रोखू शकणार नाही; काँग्रेस नेत्याचं चिथावणीखोर वक्तव्य

सकाळ डिजिटल टीम

लाऊडस्पीकर (भोंगा) आणि अजान वादात आता काँग्रेस नेत्यानंही उडी घेतलीय.

काँग्रेस नेते (Congress) आणि अनेकदा वादात सापडलेले मौलाना तौकीर रझा (Tauqeer Raza) यांनी पुन्हा एकदा प्रक्षोभक वक्तव्य केलंय. लाऊडस्पीकर (भोंगा) आणि अजान वादात आता काँग्रेस नेत्यानंही उडी घेतलीय. तौकीर रझा यांनी धमकी देत म्हंटलंय, ज्या दिवशी मुस्लिम रस्त्यावर उतरतील, तेंव्हा त्यांना ताब्यात घेणं अवघड होऊन बसेल. पीएम मोदी (Narendra Modi) धृतराष्ट्र निर्माण करत असून हे त्यांना जड जाणार आहे. मोदींची वृत्ती अशीच राहिली, तर देशाला महाभारत होण्यापासून कोणीही वाचवू शकणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिलाय.

आम्ही 10 दिवसांनी बैठक घेऊन पुन्हा एकदा जेलभरो आंदोलन करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. तौकीर रझा आज उत्तर प्रदेशात पत्रकार परिषदेत बोलत होते. रझा पुढं म्हणाले, 'ज्या दिवशी मुस्लिम (Muslim) रस्त्यावर उतरतील, तेव्हा त्यांना कोणीही रोखू शकणार नाही. मी सरकारला, विशेषत: नरेंद्र मोदींना इशारा देतोय की, त्यांनी आपला मार्ग ताबडतोब बदलावा, अन्यथा देशाचं मोठं नुकसान होईल.'

तुम्ही पंतप्रधान आहात. मात्र, देशाचं प्रतिनिधित्व न करता देशात व्देष पसरवत आहात, हे खूप जड जाणार आहे. तौकीर रझा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत त्यांना धृतराष्ट्र असंही संबोधलंय. मोदींचं असंच वागणं सुरु राहिलं तर, देशाला महाभारत होण्यापासून कोणीही वाचवू शकणार नाही, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrashekhar Bawankule : मुख्यमंत्री फडणवीस केंद्रीय मंत्री तर बावनकुळे मुख्यमंत्री? स्वत: मंत्री बावनकुळेंनींच दिलं स्पष्टीकरण

NGO साठी सुवर्णसंधी! HCL Foundation देणार 24 कोटी रुपयांचे अनुदान; अर्ज प्रक्रिया सुरू, पाहा सविस्तर

Horoscope : उद्या बनतोय दुर्मिळ दशकीर्ती योग! 'या' 5 राशी होणार मालमाल; करिअर-व्यवसायात भरभराट, आरोग्याची मोठी समस्या होणार दूर

शाहरुखने खरेदी केलं दिल्लीतील 'ते' घर, जिथं किंग खानने गौरीसोबत अनुभवला स्ट्रगल काळ, कोट्यवधींमध्ये झाली डील

Latest Marathi News Update : फिरोज शेख यांचे मेहुणे अन्वर खाजा बाऊददीन यांनी आरोप फेटाळले

SCROLL FOR NEXT