Narendra Modi_Rohit Sharma 
देश

Team India Meets PM Modi: बार्बाडोस स्टेडियमच्या मातीची चव कशी होती? PM मोदींच्या प्रश्नावर रोहितनं काय दिलं उत्तर?

टीम इंडिया भारतात दाखल झाल्यानंतर पहिल्यांदा त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : T20 क्रिकेटच्या विश्वचषकाची फायनल जिंकल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा याच्या स्टेडियममधील एका कृतीची मोठी चर्चा झाली होती. रोहितनं मैदानातील मातीचं चुंबन घेतलं होतं. त्याच्या या कृतीमुळं विविध चर्चांना उधाणही आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोहितच्या याच कृतीवरुन आजच्या भेटीत त्याला सवाल केला. त्या मातीची चव कशी होती? असा सवाल मोदींनी रोहित शर्माला केला त्याचं उत्तरही त्यानं दिलं आहे. (Team India Meets PM Modi how did Barbados stadium soil taste Modi question to Rohit Sharma)

वेस्ट इंडिजच्या बार्बाडोस इथून टीम इंडिया विश्वचषकासह भारतात दाखल झाली. टीमनं सकाळी पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी गुरुवारी भेट दिली. यावेळी मोदींनी सर्व खेळाडूंशी वैयक्तिकरित्या संवाद साधला. या भेटीचे अनेक फोटो आणि व्हिडिओजचही सकाळपासून व्हायरल झाले आहेत. तासभर झालेल्या या भेटीत टीम इंडियानं वर्ल्डकप जिंकल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

यावेळी मोदी रोहित शर्माला म्हणाले, फायनल जिंकल्यानंतर टर्फवरची माती तू चाखून पाहिलीस त्या मातीची चव नेमकी कशी होती? त्याचबरोबर कोहलीला देखील मोदींनी विचारलं की वर्ल्डकपच्या संपूर्ण सेरिजमध्ये तुझ्या धावा झाल्या नाहीत पण शेवटी फायनलमध्ये तू धावा केल्यास पण वर्ल्डकपमध्ये मोठ्या खेळीसाठी तू काय विचार करत होतास? तसंच अक्षऱ पटेलला मोदी म्हणाले की, अंतिम फेरीत टीम अडचणीत आल्यानंतर संघात पदोन्नती मिळाल्यानंतर कसं वाटलं?

हेनरिक क्लासेन आणि डेव्हिड मिलर हे दोघं क्रीजवर असताना त्यांना 30 धावांची गरज असताना दक्षिण आफ्रिका विजयाच्या उंबरठ्यावर होती. त्याचवेळी बुमराहच्या भेदक गोलंदाजीनं टीम इंडियानं सामन्यात जबरदस्त पुनरागमन केलं. त्यामुळं मोदींनी बुमराहला विचारलं की, त्यावेळी त्याच्या मनात काय चाललं होतं? तसंच पंड्याची एकूण कामगिरीबद्दल कशी होती आणि त्यानं शेवटच्या षटकाचं नियोजन कसं केलं? ज्यामुळं दक्षिण अफ्रिकेला विजयासाठी 16 धावांची गरज पडली.

एका दशकाहून अधिक काळानंतर भारताने आयसीसी ट्रॉफी जिंकल्याने सूर्यकुमार, ज्याचा सीमारेषेवरील ॲक्रोबॅटिक झेल सामना जिंकणारा ठरला, त्याला ते जादूई सात सेकंद पुन्हा जिवंत करण्यास सांगितले गेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Video : ''भारतात तुम्ही मला सुरक्षा देऊ शकत नाही का?'', राहुल गांधींची पोलिसांबरोबर बाचाबाची, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

हिंदूंची जमीन मुस्लिमांच्या नावे केल्याचे आरोप, महिला अधिकाऱ्याच्या निवासस्थानी छापे; ९० लाखांची रोकड अन् कोट्यवधींचं सोनं जप्त

Latest Marathi News Updates : ऑक्टोबरपासून रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल!

Mumbai Health Report: राज्यात पावसाळी आजारांचा कहर; मुंबईत सर्वाधिक रुग्णांची नोंद

ब्रिटिशांच्या १८८१ व करवीर संस्थानच्या १९०२ च्या गॅझेटिरमध्ये मराठा व कुणबी एकच, तरीही मराठा समाजाला झगडावं लागतय; कोल्हापुरात आंदोलन पेटणार

SCROLL FOR NEXT