Election Commission issues a strict ultimatum to Tejashwi Yadav, directing him to surrender his second voter ID card.  esakal
देश

Tejashwi Yadav : तेजस्वी यादव यांना निवडणूक आयोगाचा अल्टिमेटम!, जाणून घ्या, नेमकं काय प्रकरण?

Election Commission issues ultimatum to Tejashwi Yadav: जिल्हा प्रशासनाने तेजस्वी यादव यांना पुन्हा एकदा नोटीस पाठवली आहे. ज्यामध्ये १६ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत...

Mayur Ratnaparkhe

Election Commission Notice to Tejashwi Yadav: बिहारच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. निवडणूक आयोग आणि जिल्हा प्रशासनाने विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांना अल्टिमेटम दिला आहे आणि सांगितले आहे की, तेजस्वी यादव यांनी त्यांचे दुसरे मतदार ओळखपत्र जमा करावे.

हे प्रकरण दुसऱ्या EPIC क्रमांकाशी (मतदार ओळखपत्र) संबंधित आहे. जो तेजस्वी यादव यांनी नुकताच एका पत्रकार परिषदेत सार्वजनिक केला होता. पत्रकार परिषदेत तेजस्वी यांनी दावा केला होता की, त्यांचे नाव मतदार यादीत नाही आणि यावेळी त्यांनी दुसरा EPIC क्रमांक RAB2916120 दाखवला. परंतु, चौकशीनंतर, जिल्हा प्रशासनाने EPIC क्रमांक RAB2916120 बनावट असल्याचे घोषित केले आहे.

जिल्हा प्रशासनाच्या तपासात असे दिसून आले आहे की हा EPIC क्रमांक निवडणूक आयोग किंवा जिल्हा प्रशासनाने कधीही जारी केला नव्हता. अधिकाऱ्यांच्या मते, या क्रमांकाची नोंद कोणत्याही सरकारी डेटाबेसमध्ये नाही.

जिल्हा प्रशासनाने तेजस्वी यादव यांना पुन्हा एकदा नोटीस पाठवली आहे. ज्यामध्ये १६ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत संबंधित कार्यालयात या EPIC क्रमांकासह मतदार ओळखपत्र जमा करण्यास सांगितले आहे. बनावट मतदार ओळखपत्र बनवणे आणि वापरणे हा कायदेशीर गुन्हा आहे, ज्यासाठी कठोर कारवाई केली जाऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Women's World Cup : पाकिस्तानच्या पराभवाने टीम इंडियाची डोकेदुखी वाढवली! आता एक चूक हरमनप्रीत कौरच्या संघाला पडू शकते महागात

Neena Kulkarni : अभिनेत्री नीना कुळकर्णी यांना विष्णुदास भावे पुरस्कार; अभिनय, निर्मिती आणि दिग्दर्शनातील योगदानाबद्दल सन्मान

Latest Marathi News Live Update : परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन

Pune Crime : झोमॅटो डिलीव्हरी बॉयला मारहाण, तीन आरोपी ताब्यात

Satara Crime : 'ती' गरोदर आहे, कुणाला कळलं तर? काकाने अल्पवयीन मुलीचा गळा आवळून केला खून; मृतदेह पुरला कोयना धरणाच्या किनारी

SCROLL FOR NEXT