Telangana BJP Leader Gnanendra Prasad esakal
देश

BJP : तेलंगणात भाजप नेत्याची आत्महत्या; घरात लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

नातेवाईकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.

सकाळ डिजिटल टीम

नातेवाईकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.

हैदराबाद : भाजप नेते ज्ञानेंद्र प्रसाद (Telangana BJP Leader Gnanendra Prasad) हे तेलंगणातील त्यांच्या घरी मृतावस्थेत आढळले आहेत. पोलिसांनी (Police) सांगितलं की, 'आम्हाला सोमवारी त्यांच्या घरातून आत्महत्येची माहिती मिळाली. ज्ञानेंद्र प्रसाद यांनी पंख्याच्या साहाय्यानं गळफास लावून घेतला असून आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाहीय.

एएनआय वृत्तसंस्थेनुसार, ज्ञानेंद्र प्रसाद हे सरलिंगमपल्ली मतदारसंघातून (Serilingampally Constituency) पक्षाच्या राज्य कार्यकारिणी समितीचे सदस्य होते. पेंटहाऊसमधील एका खोलीत ते पंख्याला लटकलेल्या अवस्थेत त्यांच्या स्वीय सहायकाला आढळले. दरम्यान, मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. मृत नेत्याची कोणतीही सुसाइड नोट सापडली नसल्याची पुष्टी पोलीस अधिकाऱ्यांनी केलीय.

पीएनं पोलिसांना सांगितलं की, सोमवारी सकाळी ज्ञानेंद्र प्रसाद यांनी त्यांच्या पीएला झोपायला जात असल्याने त्रास देऊ नका, असं सांगितलं. नंतर पीएनं नाश्ता देण्यासाठी खोलीचा दरवाजा ठोठावला असता, आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर पीएनं खिडकीच्या काचा फोडल्या, तेव्हा त्यांना ज्ञानेंद्र प्रसाद खोलीत पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळले. नातेवाईकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vadodara-Mumbai: वडोदरा–मुंबई द्रुतगती महामार्गाला बंदराशी थेट जोड! १४ किमीचा नवीन रस्ता बांधणार; पण कुठे? पाहा मार्ग

मोठा निर्णय! वाहनांमध्ये GPS सक्तीचे; मार्ग बदलला तर कारवाई होणार, राज्य सरकारचा मोठी घोषणा

Madhuri Elephant Latest Update : अखेर शिक्कामोर्तब! नांदणी मठाची माधुरी हत्तीण परत येणार; हाय पावर कमिटीकडून वनताराचे संवर्धन केंद्र बांधण्यास परवानगी

कधी सुरू झाला कधी संपला समजलंच नाही! झी मराठीच्या 'या' मालिकेने अचानक घेतला निरोप; प्रेक्षकही चकीत

Chh. Sambhaji Nagar News : कन्नड तालुक्यात ६६१ शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण; शासकीय मका खरेदीचा मुहूर्त मात्र रखडलेला!

SCROLL FOR NEXT