India-and-China 
देश

भारत आणि चीन देशांमधील निवळत असलेला तणाव पुन्हा वाढला

पीटीआय

नवी दिल्ली - सीमेवरील पॅनगोंग त्सो येथील फिंगर ४ भागातून सैन्य माघारी घेण्यास चीनने नकार दिल्याने दोन देशांमधील निवळत असलेला तणाव पुन्हा वाढला आहे. भारतानेही सावध भूमिका घेत पूर्व लडाख सीमेवर अतिरिक्त रणगाडे तैनात केले आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भारत आणि चीन दरम्यान लष्कराच्या कमांडर पातळीवर काल (ता. १५) १४ तास चाललेल्या चर्चेत चीनने फिंगर ४ ठिकाणाहून सैन्य माघारीस नकार दिल्याचे समजते. गलवान खोरे, हॉटस्प्रिंग आणि गोग्रा भागातून दोन्ही देशांनी सैन्य मागे घेण्याचा निर्णय सहमतीने झाला असून त्याच्या अंमलबजावणीसाठी भारत आग्रही आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे उद्या (ता. १७) लडाख आणि जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

लष्कराच्या उत्तर विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल योगेशकुमार जोशी हे लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन लडाखमधील घडामोडींबाबत चर्चा करणार असल्याचे समजते. 

काल चीन बरोबरील लष्करी पातळीवरील चर्चेच्या चौथ्या टप्प्याचा आढावा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांनी आज घेतला.

भारत सावध
सैन्य माघारीबाबत चीन कडून होणारी टाळाटाळ आणि पूर्वानुभव लक्षात घेऊन भारतीय लष्कराने पूर्व लडाख सीमेवर चीनची संभाव्य घुसखोरी रोखण्यासाठी ६० हजार जवान सज्ज ठेवले आहेत.

एकतर्फी बदल अमान्य - भारत
ताबा रेषेसंदर्भातील भारताच्या भूमिकेत कुठलाही बदल झालेला नाही. येथील घडामोडींवर आमचे बारकाईने लक्ष आहे. या भागातील स्थितीमध्ये कोणत्याही प्रकारचा एकतर्फी बदल आम्हाला मान्य नसेल, अशी रोखठोक भूमिका परराष्ट्र मंत्रालयाने चीनबाबत घेतली आहे. याआधी भारताने चीनला अशाच प्रकारे समज दिली होती पण ड्रॅगनच्या भूमिकेत मात्र कसलाही बदल झालेला नाही.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT