Jammu and Kashmir
Jammu and Kashmir esakal
देश

दहशतवाद्यांचं घृणास्पद कृत्य, तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून हत्या

सकाळ डिजिटल टीम

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या नापाक हरकती वाढताना दिसत आहेत.

जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) दहशतवाद्यांच्या (Terrorist) नापाक हरकती वाढताना दिसत आहेत. ते सतत सर्वसामान्यांना टार्गेट करत आहेत. दरम्यान, गुरुवारी बडगाम जिल्ह्यातील (Budgam District) चदूरा तहसील कार्यालयाजवळ (Chadoora Tehsil Office) गोळीबार झाल्याची घटना समोर आली असून तहसीलदार कार्यालयातील राहुल भट या कर्मचाऱ्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केलाय. गोळीबारानंतर राहुल भट यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांनी (Jammu & Kashmir Police) दिलीय.

दहशतवादी कारवायांमध्ये हात असल्याची यासिन मलिककडून कबुली

जम्मू-काश्मीर फुटीरतावादी नेता मोहम्मद यासिन मलिकनं काल दिल्ली एनआयए न्यायालयात दहशतवादाशी संबंधित सर्व गुन्ह्यांची कबुली दिली असल्याची महत्वाची माहिती समोर आलीय. मलिक याच्यावर दिल्ली उच्च न्यायालयात बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंध कायदा (यूएपीए) यासह दहशतवादाशी संबंधित अनेक खटले दाखल आहेत. विशेष न्यायाधीश प्रवीण सिंह या प्रकरणावर येत्या १९ मे रोजी सुनावणी घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

आपल्यावर लावण्यात आलेल्या आरोपांना यापुढं आव्हान देणार नसल्याचं मलिकनं स्पष्ट केलंय. तसेच विशेष न्यायाधीश प्रवीण सिंह १९ मे रोजी यासिन मलिकच्या गुन्ह्याची शिक्षा सुनावणार आहेत. या प्रकरणांमध्ये मलिकला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. दरम्यान, विशेष न्यायालयानं काश्मिरी फुटीरतावादी फारुख अहमद दार उर्फ ​​बिट्टा कराटे, शाबीर शाह, मसरत आलम, मोहम्मद युसूफ शाह, आफताब अहमद शाह, अल्ताफ अहमद शाह, नईम खान, मोहम्मद अकबर खांडे, राजा मेहराजुद्दीन कलवाल, बशीर अहमद बट, जहूर अहमद यांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबाद पुन्हा 200 पार! रेड्डी अन् क्लासेननं स्लॉग ओव्हरमध्ये राजस्थानला धुतलं

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

SCROLL FOR NEXT