Three Terrorists Killed In Jammu Kashmir
Three Terrorists Killed In Jammu Kashmir Three Terrorists Killed In Jammu Kashmir
देश

Jammu Kashmir : लतीफसह तीन दहशतवादी ठार; लष्कराने घेतला भटच्या हत्येचा बदला

सकाळ डिजिटल टीम

Three Terrorists Killed In Jammu Kashmir जम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) काश्मिरी पंडित राहुल भट यांची हत्या करणारा दहशतवादी (Terrorist) लष्कराने चकमकीत ठार (Killed) केला आहे. चकमकीत लष्कराने एकूण तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. हे तिघेही लष्कर-ए-तैयबाचे दहशतवादी होते. लष्कराची ही कारवाई महत्त्वाची आहे. कारण, यात दहशतवादी लतीफ रादरलाही मारला गेला आहे.

बऱ्याच दिवसांपासून सुरक्षा दलाची लतीफच्या हालचालींवर नजर होती. त्याने खोऱ्यात अनेक हत्या केल्या होत्या. त्याने राहुल भटचीही हत्या केली होती. मात्र, बुधवारी लतीफ आणि त्याचे साथीदार बडगाममध्ये असल्याची गुप्त माहिती लष्कराला मिळाली होती. रणनीतीनुसार कारवाई केली असता चकमकीत तीन दहशतवादी मारले (Killed) गेले.

मारल्या गेलेल्या तीन दहशतवाद्यांकडून (Terrorist) मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि स्फोटकेही जप्त करण्यात आली आहेत. सध्या परिसराची नाकेबंदी करण्यात आली असून, शोध मोहीम सुरू आहे. यावर्षी मे महिन्यात राहुल भट यांना दहशतवाद्याने ठार केले होते. राहुल हे महसूल विभागात काम करीत होते. मात्र, १२ मे रोजी दहशतवाद्यांनी त्यांची हत्या केली होती.

गेल्या काही महिन्यांपासून दहशतवाद्यांकडून सातत्याने टार्गेट किलिंग केली जात आहे. काश्मिरी (Jammu Kashmir) पंडितांव्यतिरिक्त बाहेरील कार्यकर्ते, सरपंच यांना लक्ष्य केले जात आहे. खोऱ्यातील वातावरण बिघडवण्याचा अटोकाट प्रयत्न केला जात आहे. मात्र, ऑपरेशन ऑलआऊटच्या माध्यमातून या दहशतवाद्यांचे मनसुबेही लष्कर सातत्याने हाणून पाडत आहे.

३७० रद्द केल्यापासून खोऱ्यातील दहशतवादी घटनांमध्ये घट झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. ५ ऑगस्ट २०१६ ते ४ ऑगस्ट २०१९ दरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेच्या ३,६८६ घटना घडल्या. ५ ऑगस्ट २०१९ ते ४ ऑगस्ट २०२२ या कालावधीत केवळ ४३८ घटना घडल्या. याशिवाय ३७० रद्द करण्याच्या तीन वर्षांपूर्वी कायदा आणि सुव्यवस्थेच्या घटनांमध्ये १२४ नागरिकांचा मृत्यू झाला होता. जो विशेष दर्जा काढून टाकल्यानंतर शून्य झाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

Water On Moon : चंद्रावर अपेक्षेपेक्षा जास्त पाण्याचे साठे.... इस्त्रोने केला मोठा खुलासा

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आसामच्या काही भागांमध्ये पूर

SCROLL FOR NEXT