देश

कोरोना योद्ध्यांचे सैन्यदलांकडून आभार!  उद्या कोव्हिड रुग्णालयांवर हवाई पुष्पवृष्टी

सकाळ वृत्तसेवा


नवी दिल्ली: कोरोना योद्ध्यांच्या सन्मानार्थ भारतीय हवाई दल रविवारी (ता. 3) दोन फ्लाय पास्ट करणार आहे. या उड्डाणांदरम्यान कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांवर पुष्पवृष्टी केली जाईल, अशी घोषणा सैन्यदलांचे प्रमुख (चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ) बिपिन रावत यांनी शुक्रवारी (ता. 1) केली.

हवाई दलाचे हे फ्लाय पास्ट श्रीनगर ते त्रिवेंद्रम आणि दिब्रूगढ ते कच्छ असे होतील. त्यात लढाऊ आणि मालवाहू विमाने सहभागी होतील, अशी माहिती जनरल बिपिन रावत आणि तिन्ही सैन्यदलांचे प्रमुखांनी पत्रकार परिषदेत दिली. कोव्हिड-19 विषाणूबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांवर या विमानांतून पुष्पवृष्टी केली जाईल. त्याचप्रमाणे रविवारीच सशस्त्र दलांकडून पोलिस स्मारकाला पुष्पांजली अर्पण केली जाणार आहे. देशातील जवळपास सर्व जिल्ह्यांतील कोव्हिड रुग्णालयांनजीक लष्कराच्या पथकाचे बॅंडवादन होईल. 

डॉक्टर, परिचारिका, सफाई कर्मचारी, पोलिस, होम गार्ड, डिलिव्हरी बॉय आणि प्रसार माध्यमे या सर्व कोरोना योद्ध्यांबाबत आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो. कठीण परिस्थितीत जीवन कसे सुरू ठेवायचे याबाबत सरकारचा संदेश हे कोरोना योद्धे नागरिकांपर्यंत पोहोचवत आहेत. सशस्त्र दले देशासोबत भक्कमपणे उभी आहेत. या युद्धातील विजय म्हणजे देशातील प्रत्येक नागरिकाची शिस्त आणि संयमाचे फळ असेल, असे जनरल रावत म्हणाले. 
कोरोना महामारीमुळे भारतात लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच सीडीएस जनरल बिपिन रावत यांनी तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखांसह माध्यमांशी संवाद साधला. सैन्यदलांनी देशात अनेक ठिकाणी क्वारंटाईन सेंटर्स सुरू केली आहेत. 

अमेरिकेतही मानवंदना
दोन दिवसांपूर्वी अमेरिकी सैन्यदलानेही कोरोना योद्ध्यांच्या सन्मानार्थ फ्लाय पास्ट केले होते. न्यू यॉर्क, न्यू जर्सी आणि फिलाडेल्फिया येथे झालेल्या या उड्डाणांत यूएस आर्मी, एअर फोर्स आणि नेव्हीमधील 12 लढाऊ जेट विमाने सहभागी झाली होती. या 40 मिनिटांच्या कार्यक्रमाची तयारी तब्बल महिनाभर सुरू होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT