High Court slammed Twitter Sakal
देश

कायद्याचा आदर करा नाहीतर दुकान बंद करा; न्यायालयाने ट्विटरला फटकारले

आदेशाचे पालन न केल्याच्या मुद्द्यावर ट्विटर (Twitter) बंद का करू नये, याचे स्पष्टीकरण देण्याचे निर्देश हायकोर्टाने म्हटले आहे.

सुरज सकुंडे

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरला (Twitter) आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) उच्च न्यायालयाने (High Court) मंगळवारी चांगलंच फटकारले आहे.आक्षेपार्ह मजकूर काढून टाकण्याच्या न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्याबद्दल न्यायालयाने ट्विटरवर नाराजी व्यक्त केली आहे. आदेशाचे पालन न केल्याच्या मुद्द्यावर ट्विटर बंद का करू नये, याचे स्पष्टीकरण देण्याचे निर्देश हायकोर्टाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरला दिले आहेत. तुम्हाला तुमची सेवा चालू ठेवायची असेल, तर तुम्हाला या भूमीच्या कायद्याचा आदर करावा लागेल, अन्यथा तुम्ही तुमचे 'दुकान' बंद करा, असे न्यायालयाने कडक शब्दात सुनावले आहे. (The Andhra Pradesh High Court slammed Twitter for defying its orders to remove objectionable content.)

उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती एम सत्यनारायण मूर्ती यांच्या खंडपीठाने सोमवारी सांगितले की, न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करणे हे न्यायालयाचा अवमान आहे. याबदद्ल ट्विटरवर फौजदारी कारवाई का करू नये, याचे स्पष्टीकरणही न्यायालयाने मागवले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ७ फेब्रुवारीला होणार आहे. पुढील सुनावणीपूर्वी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने ट्विटरला दिले आहेत. आजच्या सुनावणीदरम्यान सीबीआयची (CBI) बाजू मांडणाऱ्या अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एसव्ही राजू यांनी ट्विटर आपल्या प्लॅटफॉर्मवरून आक्षेपार्ह सामग्री काढून टाकण्यात सहकार्य करत नसल्याचे म्हटले होते. यावर खंडपीठाने ट्विटरविरुद्ध फौजदारी कारवाई का सुरू करू नये, याचे स्पष्टीकरण मागवले आहे.

तांत्रिक कारण दाखवून या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले जाऊ नये, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. खंडपीठाने सांगितले की, "गेल्या सुनावणीच्या वेळी आम्ही आक्षेपार्ह साहित्य तत्काळ हटवावे, असे स्पष्ट आदेश दिले होते. तसे न करणे हा न्यायालयाचा अवमान आहे. तुम्हाला तुमची सेवा चालू ठेवायची असेल तर तुम्हाला या भूमीच्या कायद्याचा आदर करावा लागेल, अन्यथा तुम्ही तुमचे 'दुकान' बंद करा, असं न्यायालयाने ट्विटरला सुनावले आहे.

सत्ताधारी वायएसआर काँग्रेसचे (YSR Congress) सदस्य आणि समर्थकांकडून विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर (Social Media) न्यायालयाविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट केल्या जात असल्याची दखल उच्च न्यायालय स्वत:हून घेतली आहे. सीबीआय या प्रकरणाचा तपास करत असून याप्रकरणी अनेकांना अटक करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Bus Accident Video: पुण्यात बसचा थरार! चालक उतरला अन् बस चालू लागली; चालत्या गाडीतून प्रवाशांच्या उड्या

Asim Sarode: अ‍ॅड. असीम सरोदे यांची सनद रद्द करण्यास ‘बीसीआय’ची स्थगिती; आदेशात नेमकं काय म्हटलं?

Mangalwedha News : नगराध्यक्षपदाच्या तीन अर्जासह नगरसेवकाच्या दोन अर्जावरील निकालाची मंगळवेढेकरांना प्रतीक्षा

Angar Election: राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद का झाला? 'या' होणार बिनविरोध नगराध्यक्ष?

IND W vs BAN W: वर्ल्ड कप जिंकल्यानंतर होणारी भारतीय संघाची मालिका BCCI कडून स्थगित! जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT