Mercury will rise further this week Mercury will rise further this week
देश

मार्चमध्येच तळपतोय सूर्य; या आठवड्यात पाऱ्यात होईल आणखी वाढ

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : मार्च महिन्यात उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवू लागला आहे. दिवसागणिक तापमानात वाढ होत असल्याचे दिसत आहे. भारतीय हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिल्याने या आठवड्यात पाऱ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मंगळवारी (ता. १५) अकोल्यात ४१.१ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. दिल्लीतील तापमानात तीन अंशांनी वाढ झाली आहे. (Mercury will rise further this week)

महाराष्ट्रात मार्चच्या मध्यावरच उष्णतेची (Summer) तीव्रता दिसून येत आहे. मुंबईसह काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तापमानाचा पारा ३८ अंशांच्या पुढे जाऊन कायम राहण्याचा अंदाज आहे. उन्हाळ्याच्या तडाख्याने लोक आधीच हैराण झाले आहेत. यामुळे हवामानातील बदल चिंतेचा विषय होत चालला आहे. समुद्रकिनाऱ्यालगत असलेले मुंबई अत्यंत संवेदनशील असून, मुंबई हवामान कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.

राजस्थान व गुजरातसह अन्य राज्यांतील लाटसदृश वातावरणामुळे सध्या उन्हाची (Summer) सौम्य लाट पसरली आहे. सकाळपासूनच ऊन तापायला सुरुवात होते. दुपारच्या सुमारास सूर्य डोक्यावर आल्यानंतर उन्हाचे चटके आणखीनच जाणवू लागतात. ऊन वाढू लागल्यामुळे नागरिक विशेष काळजी घेताना दिसत आहेत. हवामान विभागाचा इशारा लक्षात घेता या आठवड्यात पारा आणखी चढण्याची शक्यता आहे. या आठवड्याअखेर कमाल तापमान ४२ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

तापमानात सातत्याने वाढ

मंगळवारी दिल्लीतील तापमानात तीन अंशांनी वाढ झाली. किमान तापमान सामान्यापेक्षा तीन अंशांनी वाढून १८.९ अंश सेल्सिअसवर पोहोचले. तर गुजरात, राजस्थान, गोवा, ओडिशा आणि मध्य प्रदेशातील काही भागात तापमान ३८ ते ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. दिल्लीत सकाळी ८.३० वाजता सापेक्ष आर्द्रता ८५ टक्के होती. सकाळचे किमान तापमान १८.९ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, असे भारतीय हवामान विभागाने (IMD) सांगितले.

आणखी तीन दिवस तापमान वाढणार

१८ मार्चपर्यंत दिल्लीतील तापमान ३६ ते ३७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचेल, असे हवामान खात्याचे म्हणणे आहे. वाऱ्यामुळे परिस्थितीत काही बदल होईल. १९ मार्च रोजी थोडा दिलासा मिळेल. त्यानंतर तापमानात आणखी वाढ होणार आहे. १७ ते १७ मार्च रोजी राजस्थानच्या अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. गुजरात, राजस्थान, गोवा, ओडिशा आणि मध्य प्रदेशात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI Tax: यूपीआय टॅक्स मागे घेण्याचं राहुल गांधींचं आवाहन; इंदिरा गांधींचा दाखला देत पंतप्रधान मोदींवर घणाघात

HOROSCOPE: वयाची 50 ओलांडली तरी दिसतात तरुण! ‘या’ 6 राशींच्या लोकांचं व्यक्तिमत्त्व आणि आत्मविश्वास असतो जबरदस्त; तुमची रास कोणती?

ICC Rankings : अभिषेक शर्माने पाकिस्तानी फलंदाजाला लोळवले! Ishan Kishan ने त्याचे अव्वल स्थान कायम राखले

Hingoli News : दुष्काळाच्या झळांनी खरीप करपला; शेतकऱ्यांना मदतीची आस! मानसपिंप्रीत पालकमंत्री नरहरी झिरवाळांकडून नुकसानीची पाहणी, एकरी ५० हजारांची मदतीची मागणी

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन दगडूशेठच्या दर्शनाला

SCROLL FOR NEXT