Campaign From Jail Supreme Court Esakal
देश

Campaign From Jail: तुरुंगात असलेल्या नेत्यांना ऑनलाइन प्रचार करता येणार का? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Supreme Court: याचिका 'अत्यंत धाडसी' आणि कायद्याच्या मूलभूत तत्त्वांच्या विरोधात असल्याचे सांगून न्यायालयाने म्हटले की न्यायालये धोरणात्मक निर्णय घेत नाहीत आणि अशा मुद्द्यांवर निर्णय घेणे हे संसदेचे काम आहे.

आशुतोष मसगौंडे

अटक केलेल्या नेत्यांना ऑनलाइन प्रचार करण्याची परवानगी मागणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच फेटाळून लावली.

न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती उज्वल भुयान यांच्या खंडपीठाने यापूर्वी ही याचिका फेटाळणाऱ्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास नकार दिला.

तुरुंगात असलेल्या नेत्यांना ऑनलाइन प्रचार करण्याची परवानगी देण्याच्या याचिकेवर सुनावणी करताना खंडपीठ म्हणाले, ही याचिका वाईट हेतूने दाखल करण्यात आली आहे. ही एका राजकारण्यावर (अरविंद केजरीवाल) केंद्रित आहे, जो या न्यायालयात दररोज उत्तम वकिलांसह हजर असतो. कथित जनहितार्थ दाखल करण्यात आलेल्या या याचिकेवर विचार करणे आम्ही आवश्यक मानत नाही.

अटक केलेल्या राजकीय नेत्यांना आभासी पद्धतीने प्रचार करण्याची परवानगी मागणाऱ्या कायद्याचा विद्यार्थी अमरजीत गुप्ता याने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती.

याचिका फेटाळताना, न्यायालयाने म्हटले की यामुळे भयंकर गुन्हेगारांना, अगदी फरारी गुंड दाऊद इब्राहिमलाही राजकीय पक्षांमध्ये नोंदणी आणि प्रचार करण्यास प्रोत्साहन मिळेल.

याचिका 'अत्यंत धाडसी' आणि कायद्याच्या मूलभूत तत्त्वांच्या विरोधात असल्याचे सांगून न्यायालयाने म्हटले की न्यायालये धोरणात्मक निर्णय घेत नाहीत आणि अशा मुद्द्यांवर निर्णय घेणे हे संसदेचे काम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT