Police brutality in lockup Police brutality in lockup
देश

क्रौर्याची परिसीमा! पोलिसांनी तरुणाला विवस्त्र करून बसवले स्टंपवर

नीलेश डाखोरे, सकाळ डिजिटल टीम

मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी तरुणाला पोलिस ठाण्यात आणून पोलिसांनी क्रौर्याची परिसीमा ओलांडली. ठाण्यात तरुणाचे कपडे उतरवल्यानंतर क्रिकेटच्या स्टंपवर तेल लावून बसवले. तसेच लघवी प्यायला लावली. हा प्रकार राजस्थानमधील अजमेरच्या जवाजा पोलिस ठाण्यात घडला. तरुणाने साहाय्यक पोलिस अधीक्षक सुमित मेहरा यांच्याकडे लेखी तक्रार करून दोषी पोलिसांवर कारवाईची मागणी केली आहे. हर्ष कमल असे पीडित तरुणाचे नाव आहे. (Police brutality in lockup)

प्राप्त माहितीनुसार, नरेंद्र सिंह (रा. गंगा कॉलनी, उदयपूर रोड चुंगी नाका, बेवार) यांनी फिर्यादीत सांगितले की, त्यांचा नातेवाईक हर्ष कमल हा मुलीला पळवून घेऊन गेला होता. याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली आणि गांधीधाम येथे कामावर निघून गेले. यानंतर जावजा पोलिसांनी (Police) हर्षला गांधीधाम येथून पकडून पोलिस ठाण्यात आणले. तसेच त्याचे कपडे काढले आणि लॉकअपमध्ये बंद करून बेदम मारहाण केली.

यानंतर पोलिस (police) शिपाई रामराज आणि जितेंद्र सिंग यांच्यासह चार पोलिसांनी क्रिकेटचा स्टंप आणला आणि त्याला तेल लावले. या स्टंपवर बसून छळ केला. एवढेच नाही तर बळजबरीने लघवी करायला लावले आणि प्यायला लावले. तसेच धमक्याही दिल्या. यानंतर पोलिसांनी कलम १५१ अन्वये अटक करून उपविभागीय अधिकाऱ्यांसमोर हजर केले, असा आरोप हर्षने केला आहे.

पोलिस अधीक्षकांनी दिले तपासाचे निर्देश

या प्रकरणामध्ये किती सत्यता आहे, हे तपासानंतरच समोर येईल. हर्षने एसपी अजमेर यांच्यासमोर हजर होऊन दोषी पोलिस अधिकारी आणि पोलिसांवर गुन्हा दाखल करून कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी प्रकरण गांभीर्याने घेत साहाय्यक पोलिस अधीक्षक सुमित मेहरा यांना तपासाचे निर्देश दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Orange Cap : संजू सॅमसन गरजला! ख्रिस गेलचा १३ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, ऑरेंज कॅपच्या शर्यतीत निर्णायक वळण

IPL 2026 Point Table: संजू सॅमसनची मॅच विनिंग खेळी! ७ चौकार, ६ षटकारासह ८७ धावा; चेन्नई प्लेऑफच्या शर्यतीत कायम, दिल्लीचं काय?

West Bengal : ममतांचा राजीनाम्यास नकार, भाजपचा मुख्यमंत्री कसा होणार? राज्यपालांकडे काय पर्याय?

पर्वती पायथ्याला ९ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न, नागरिक संतप्त; संशयिताला अटक, घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा तैनात

जुना बोरामणी नाका ‘ब्लॅक स्पॉट’! रुग्णाचे रक्ताचे नमुने घ्यायला जाताना रक्तपेढीचा कर्मचारी ठार; 1 वर्षाच्या मुलीचा 3 दिवसांपूर्वीच झाला होता वाढदिवस

SCROLL FOR NEXT