PM Modi 
देश

PM Modi: सत्तेच्या उपभोगासाठी तिसरा कार्यकाळ मागत नाही, आणखी खूप निर्णय घ्यायचेत; पंतप्रधान मोदींचे संकेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित केले.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, भाजपचा कार्यकाळ देशसेवेसाठी काहींनाकाही करतच असतो. देश आता प्रगती करत आहे. सत्तेसाठी तिसरा कार्यकाळ मागत नाहीये, सर आणखी काही निर्णय घेण्यासाठी सत्ता मागत आहे, असं म्हणत पंतप्रधान मोदी यांनी येणाऱ्या काळातील आणखी काही मोठ्या निर्णयांचे संकेत दिले आहेत. (third term is not for power there are many more decisions to be made said Prime Minister narendra Modi BJP National Convention 2024 )

पुढील १०० दिवस नवी उर्जा, नवा उत्साह, नवा विश्वास, नव्या उमंगसह काम करावे लागेल. विरोधी पक्षातीले नेते देखील म्हणत आहेत एनडीए ४०० चा आकडा पार परेल. एनडीएला ४०० पार करायचं असेल तर भाजपला ३७० चा मैलाचा दगड गाठावा लागेल. आपण राजनीती नाही तर राष्ट्रनीतीसाठी बाहेर पडलो आहोत, असं मोदी म्हणाले.

संपूर्ण देशाला माहितीये की आता आपण महाघोटाळा आणि दहशतवादी हल्ल्यांपासून मुक्त झालो आहोत. आमच्या सरकारने गरीब आणि मध्यमवर्गाचे जीवन चांगले करण्याचा प्रयत्न केला आहे. सत्तेचा उपभोग घेण्यासाठी सत्ता मागत नाहीये. येत्या पाच वर्षात देशात अधिक गतीने काम करायचं आहे. येणारे पाच वर्षे विकसित भारताच्या दिशेने मारलेली उडी असेल, असं मोदी म्हणाले.

काँग्रेसवर टीका

काँग्रेस आपल्या लष्कराचे मनोबल कमी करण्याचं काम करत आहे. काँग्रेस अस्थिरता आणि घराणेशाहीचं प्रतिक आहे. काँग्रेस गोंधळलेली आहे. मोदीवर टीका करणे हा एकच त्यांचा अजेंडा आहे. भारत सशक्त झाल्यास जगाचं हित होईल हे सर्वत जण मानतात. पाच अरब देशांनी मला सर्वोच्च सन्मान दिला. काँग्रेसकडे विकासाचा रोडमॅप नाही. त्यांच्याकडे वैचारिक लढाईचं सामर्थ्य नाही, असं मोदी म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या भावात घसरण; आठवड्याच्या पहिल्या दिवशी काय आहे 24 कॅरेट सोन्याचा भाव?

Kolhapur Crime: 'कुरुंदवाडात धारदार शस्त्राने युवकावर सपासप वार'; एकमेकाकडे खुन्नसपणे बघण्याच्या रागातून झाला वाद

Trimbakeshwar : पहिने धबधब्याला पर्यटकांची गर्दी; नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर तुफान कोंडी

Latest Maharashtra News Updates : मरकटवाडीच्या ग्रामस्थांचं विधानभवन बाहेर आंदोलन

Nagpur Crime : निर्माल्य विसर्जनानंतर पतीसोबत काढला 'सेल्फी' अन् महिलेने नदीत मारली उडी; दोघांत असं काय घडलं?

SCROLL FOR NEXT