देश

VIDEO: जगातील सर्वात मोठा राष्ट्रीय ध्वज; लेहमध्ये तिरंग्याचं अनावरण

विनायक होगाडे

लेह: यावर्षी संपूर्ण देश महात्मा गांधींची 152 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करत आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा स्पीकर यांच्यासह अनेक नेत्यांनी गांधींच्या समाधी स्थळी जाऊन त्यांना आदरांजली वाहिली. तिथे एका प्रार्थना सभेचंही आयोजन करण्यात आलं आहे. दुसरीकडे आजच्या दिनाचं औचित्य साधत जगातील सर्वांत मोठ्या राष्ट्रध्वजाचं अनावरण देखील करण्यात आलं आहे.

लेहमध्ये जगातील सर्वांत मोठा खादीचा राष्ट्रीय ध्वज फडकावण्यात आला आहे. लडाखचे उपराज्यपाल आर के माथुर यांनी या ध्वजाचं अनावरण केलं आहे. या प्रसंगी सैन्याचे प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे देखील उपस्थिती होते.

यावेळी लडाखचे उपराज्यपाल आर के माथुर यांनी म्हटलंय की, गांधीजींनी म्हटलंय की, आपला राष्ट्रध्वज हा एकता, मानवतेचं प्रतिक असून देशातील प्रत्येकांनी स्विकारलेले महत्त्वाचे प्रतिक आहे. देशाच्या महानतेचं हा प्रतिक आहे. येत्या काही वर्षांमध्ये हा ध्वज लेहमध्ये आपल्या सैनिकांसाठी उत्साह आणि प्रोत्साहन देणारं महत्त्वाचं ठिकाण असेल.

काय आहेत या ध्वजाची वैशिष्ट्ये?

  • जगातील सर्वांत मोठा तिरंगा ध्वज

  • हा ध्वज खादीचा आहे.

  • हा ध्वज 225 फूट लांबीचा आणि 150 फूट रुंदीचा आहे.

  • या तिरंग्यांचं वजन 1400 किलो इतकं आहे.

  • हा ध्वज 37,500 चौरस फूट क्षेत्र व्यापतो

  • या ध्वजाची निर्मिती करण्यासाठी 49 दिवस लागले

  • या भारतीय ध्वजाची निर्मिती 57 इंजिनिअर रेजिमेंटने केली आहे.

भारतीय लष्कराच्या 57 इंजिनीअर रेजिमेंटच्या 150 जवानांनी हा खादीचा ध्वज टेकडीच्या शिखरावर नेला. लेह, लडाखमध्ये जमिनीच्या पातळीपासून 2000 फूट उंचीवर एका टेकडीच्या शिखरावर नेण्यासाठी सैन्याला वर पोहोचण्यास दोन तास लागले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran war : युद्ध पुन्हा भडकले ! शस्त्रसंधी सुरु असतानाच अमेरिकेचा हल्ला, इराणचाही प्रतिहल्ला; कुवेत ठरलं रणांगण

Viral Video: RCB च्या विजयानंतर विराट-अनुष्काचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून चाहते झाले वेडे!

ओबीसी आरक्षणावर गदा, ग्रामपंचायतीच्या रणधुमाळीआधी राज्य निवडणूक आयोगाचे नवे आदेश

Accident News: मराठा आंदोलनातून परतताना काळाचा घाला; सरडेवाडीतील एकाचा मृत्यू, दोघे जखमी

Latest Marathi News Update : 'शिवाजी कोण होता?' पुस्तकाच्या बनावट प्रति बाजारात

SCROLL FOR NEXT