Thoothedhara, Viral Vide
Thoothedhara, Viral Vide Sakal
देश

Viral Video: दुर्गामातेला प्रसन्न करण्यासाठी अंगावर फेकतात आगीचे गोळे; 'थूथेधरा'ची अनोखी परंपरा

सकाळ डिजिटल टीम

भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. विविधतेतील एकता हेच या देशाचं वैशिष्ट्य आहे. देशभरातील विविध ठिकाणी काही अशा परंपरा पाळल्या जातात की पाहणारे आश्चर्यचकीत होतात. अशी एक परंपरा पाळली जाते कर्नाटकातील कतील येथे. येथील दुर्गा परमेश्वरी मंदिरातील भक्त दुर्गामातेला प्रसन्न करण्यासाठी एकमेकांवर आगीचे गोळे फेकतात. या आश्चर्यकारक परंपरेला थूथेधरा (Thoothedhara) किंवा अग्नि खेळी (Agni Kheli) असेही म्हणतात. थूथेधराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

या अग्नी खेळी परंपरेचे आयोजन शुक्रवारी कर्नाटकातील कतील येथे करण्यात आले. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये दुर्गामातेचे भक्त एकमेकांवर आगीचे गोळे फेकताना दिसत आहेत. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये भाविक फक्त धोतर घातलेले दिसत आहेत.

हा व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. एएनआय या वृत्तसंस्थेने हा व्हिडीओ ट्वीट केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रिटिश साम्राज्याच्या लोकशाहीतील पाऊलखुणा

राजकीय पक्षांच्या नजरेतून स्त्रियांचे प्रश्‍न

आयुर्वेदिक पंचकर्म

हसताय ना, हसलंच पाहिजे!

रक्तातील साखरेचे ‘हिस्टरी बुक’

SCROLL FOR NEXT