Tirupati Balaji Darshan Road Accident esakal
देश

Tirupati Balaji : बालाजीचं दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; अपघातात पाच ठार, 11 जण गंभीर जखमी

भाविकांचे वाहन कडप्पाहून चित्तूरकडे जात होते. वाहनात एकूण सोळा भाविक होते.

अमृत वेताळ

बेळगाव जिल्ह्यातील अथणी येथील १६ भाविक वाहनांतून तिरुपती बालाजी मंदिरात दर्शन घेऊन घरी परतत होते.

आंध्र प्रदेश, बेळगाव : तिरुपती बालाजीचे दर्शन (Tirupati Balaji Darshan) घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाने मालवाहू ट्रकला मागून जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात (Road Accident) पाच भाविक जागीच ठार झाले. चालकासह पाचजण बडची गावातील (ता. अथणी जि. बेळगाव) राहणारे आहेत.

शुक्रवारी (ता. १५) सकाळी आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) अन्नमया जिल्ह्यातील तिरुपतीजवळील कव्वीपल्ली येथे हा अपघात घडला आहे. अपघातात अकरा जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हनुमंत अजूर (वय ३२), महानंदा अजूर (३२), शोभा अजूर (३२), अंबिका अजूर (१४, चौघेही रा. बडची, ता. अथणी, जि. बेळगाव), हनुमंत जाधव (४२) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. अकरा जखमींपैकी सात जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

बेळगाव जिल्ह्यातील अथणी येथील १६ भाविक वाहनांतून तिरुपती बालाजी मंदिरात दर्शन घेऊन घरी परतत होते. हनुमंत जाधव हा वाहन चालवत होता. आंध्र प्रदेशातील अन्नमया जिल्ह्यात आल्यानंतर भरधाव वाहनाने मालवाहू ट्रकला मागून धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला. सुरुवातीला मृतांची ओळख पटली नाही, त्यांच्याकडे सापडलेल्या ओळखपत्रावरून काही वेळानंतर ओळख पटविण्यात यश आले.

अपघातातील जखमींना तिरुपतीतील रुवा रुग्णालयात दाखल केले आहे. सात जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी मृतांच्या नातेवाईकांना अपघाताची माहिती देऊन घटनास्थळी पाचारण केले. नातेवाईक दाखल झाल्यानंतर पंचनामा करून उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

वाहनात सोळा भाविक

नागाबाबू मंडळ पोलिस निरीक्षक मेथाम्पल्ली म्हणाले, ‘भाविकांचे वाहन कडप्पाहून चित्तूरकडे जात होते. वाहनात एकूण सोळा भाविक होते. ते सर्व तिरुपतीचे दर्शन घेतल्यानंतर बेळगावकडे येत होते. अपघात नेमका कसा झाला, याची माहिती मिळत नाही. अपघातात पाच भाविकांचा मृत्यू झाला. तर अकरा जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यापैकी सात जणांची प्रकृती चिंताजनक बनली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT