Nandan Nilekani Sakal
देश

असा झाला आधार कार्डचा जन्म; जाणून घ्या रंजक कहाणी

आधार कार्डच्या निर्मितीत नंदन निलेकणी महत्त्वाची भूमिका बजावली.

सकाळ डिजिटल टीम

आधार कार्ड हे आपल्या महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. बँकेत खातं उघडणं, ड्रायव्हिंग लायसन्स, घर-जमिन नोंदणी, कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेणं, एवढेच काय तर सरकाही दवाखान्यात उपचार घेण्यापासून ते अगदी शिवभोजन थाळी घेण्यापर्यंत सर्वत्र आपल्याला आधार कार्ड (Aadhaar Card) दाखवावंं लागते. परंतु या आधार कार्डच्या निर्मितीत नंदन निलेकणी महत्त्वाची भुमिका बजावली. आधार कार्डचे प्रणेते नंदन निलकेणी (Nandan Nilkeni) यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

नंदन निलकेणी यांचा जन्म २ जून १९५५ बंगळूरू येथे झाला.बालवयातच नंदन यांच्यावर आपल्या वडिलांच्या फॅबियन समाजवादी विचारधारेचा प्रभाव पडला. नंदन यांनी विशप कॉटन बॉइज आणि सेंट जोसेफ हायस्कूल या शाळांमधून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. पुढे त्यांनी आयआयटी मुंबई मधून इलेक्ट्रीकल इंजिनिअरची पदवी प्राप्त केली.

मुंबईतील "पटणी कॉम्प्युटर सिस्टिम" या संस्थेतून आपल्या यशस्वी कारकिर्दीची सुरूवात केली. कालांतराने १९८१ साली मूर्ती यांनी निलेकणी व पटनी संस्थेतील इतर पाच सहकाऱ्यांसोबत इन्फोसिसची स्थापना केली.

आपल्या 'इमॅजिनिंग इंडीया' या पुस्तकात निलेकणी यांनी अपघाताने बनलेला उद्योजक असा स्वतःचा उल्लेख केला आहे. त्यांच्या मित्र व परिवाराच्या मते इन्फोसिसचा (Infosys) घटक बनणे ही वेडेपणाची गोष्ट होती. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर इन्फोसिस संस्था लौकिक प्राप्त करेल, अशी कल्पना त्यांच्या जवळच्या माणसांनी कधीही केली नव्हती.

पण आपल्या जिद्दीने व विश्वासाने इतरांचे हे दावे निलेकणी यांनी खोटे ठरविले. इन्फोसिसमध्ये त्यांनी अनेक महत्त्वाची पदांची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.

पुढे २००९ साली युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण) विभागाच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली. युआयडीएआयचे प्रमुख म्हणून त्यांच्या देखरेखीखाली आधार कार्ड प्रणाली भारतात अस्तित्वात आली.

१४० कोटी लोकसंख्या असेलल्या आणि भाषा व प्रांतिक वैविधता असणाऱ्या देशात जात, धर्म, भाषा, स्थळ यांच्या पलिकडे जाऊन ‘आधार कार्ड’ ही सर्व देशवासियांसाठी त्यांच्या अस्तित्वाची एक ओळख ठरली आहे. भारतात आधारकार्ड आज ओळख प्रमाणपत्र म्हणून सर्वत्र वापरले जाते.

दारिद्रयरेषेखालील लोक, आदिवासी लोक तसेच दुर्गम भागात वास्तव्य करणाऱ्या व्यक्तींना अर्थव्यवस्थेत औपचारिकरीत्या समाविष्ट करून घेण्यात आधार कार्डांचे महत्त्वाचे योगदान भविष्यात असेल. याचे श्रेय प्रामुख्याने नंदन निलकेणी यांना जाते. भारत सरकारनेही त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करत २००६ साली त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे.

नंदन निलकेणी आणखी एक विशेष महत्त्वाची गोष्ट ते सोशल मीडियाच्या जमान्यात व्हॉट्सअप वापरत नाहीत. तुम्हाला हे खोट वाटेलं पण याविषयी नंदन नीलेकणी यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर करत याविषयी खुलासा दिला होता. त्यात त्यांनी आपण व्हॉट्सअ‍ॅप चालवत नसल्याची माहिती दिली आहे.

नंदन निलकेणी यांनी जो फोटो शेअर केला आहे. त्या फोटोमध्ये त्यांनी आपल्या मोबाईल फोनची स्क्रीन शेअर केली आहे, यात इतर अनेक महत्त्वाचे अ‍ॅप्लिकेशन दिसत आहेत. परंतु यामध्ये आपल्या सगळयांच लाडकं व्हॉट्सअ‍ॅपचा कुठेच दिसत नाही. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी म्हटलंय "व्हॉट्सअ‍ॅप नाही, नोटिफिकेशनची सूचना नाही, फक्त आवश्यक अ‍ॅप्स."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT