crime News crime News
देश

मुलगी झोपेत अंथरूण ओला करायची; महिलेने गरम वस्तूने लावले गुप्तांगावर डाग

सकाळ डिजिटल टीम

इंदूर : एका महिलेने नऊ वर्षांच्या दत्तक घेतलेल्या मुलीच्या गुप्तांगावर डाग (Torture) पडले. कारण, ती रात्री झोपताना पलंग ओला करायची. मुलीची स्थिती पाहता दत्तक घेणारी महिला अत्यंत विकृत मानसिकतेची असल्याचे लक्षात येते. तिने क्रौर्याच्या मर्यादा ओलांडल्याचे पोलिस अधिकाऱ्याने सोमवारी सांगितले. ही घटना मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये घडली.

रात्री झोपताना अंथरूण ओले केल्यामुळे शिक्षेच्या नावाखाली ४० वर्षीय महिलेच्या कथित अत्याचाराला बळी पडलेल्या मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच महिलेविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे. आरोपी महिला पीडित मुलीची जवळची नातेवाईक आहे. तिच्या कुटुंबीयांनी मुलीला दत्तक घेतले होते, असे एमआयजी पोलिस स्टेशनचे प्रभारी अजय वर्मा यांनी सांगितले.

आरोपी महिलेला अद्याप औपचारिकरीत्या अटक करण्यात आलेली नाही. मुलीच्या गुप्तांगावर जळत्या वस्तूने जाळल्यामुळे गंभीर जखमा झाल्या आहेत. तिच्या डोक्यावरील काही केस उपटले आहेत. तिच्या शरीरावर नखांच्या खुणा (Torture) आहेत, असे बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष पल्लवी पोरवाल यांनी सांगितले.

पोलिसांनी महिलेविरुद्ध सौम्य कलमांतर्गत एफआयआर नोंदवला आहे. या प्रकरणात बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा (POCSO) आणि इतर गंभीर तरतुदी जोडल्या पाहिजेत, असे बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष पल्लवी पोरवाल म्हणाल्या. एमआयजीचे एसएचओ वर्मा म्हणाले की, मुलीचे वक्तव्य व उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या अहवालाच्या आधारे एफआयआरमध्ये योग्य ती कलमे जोडली जातील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Sarpanch News : सरपंचांचे अधिकार संपले?, फडणवीस सरकारचा निर्णय; मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकांना अधिकार

प्रौढ बेपत्ता झाल्यास आता अपहरणाचा गुन्हा, नवी मुंबईत पहिली कारवाई; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची अंमलबजावणी

Leopard Attack Junnar : औषध फवारणीचा पंप ठरला ढाल; बिबट्याच्या हल्ल्यातून शेतकरी दाम्पत्य थोडक्यात बचावले

Marathi News Live Updates : “एकनाथ शिंदे यांना मराठ्यांमध्येच मारामाऱ्या लावून दंगल घडवायची आहे", जरांगे यांचा गंभीर आरोप

Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

SCROLL FOR NEXT