One Rupee Note
One Rupee Note System
देश

बसल्या बसल्या मालामाल होण्याची संधी! जाणून घ्या, कुठे, कसं?

सिद्धार्थ लाटकर

सातारा : तुम्हांला जुन्या नोटा, नाणी (indian currency) साठवून ठेवायची आवड आहे. वेगवेळ्या प्रकारचे कॉईन्स आणि नोटा जमवण्याचा छंद आहे. तुमचा हा छंद तुम्हांला आता खूप माेठी रक्कम मिळवून देणार आहे. हाेय अवघ्या एक रुपयाची नोट तुम्हांला मोठी रक्कम मिळवून देईल. एक रुपयाची नोट विकून तुम्हाला हजारो रुपये कमवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. केंद्र सरकारने एक रुपयाची नोट चलनातून बंद करण्यात आली असली, तरी आता मात्र बाजारात याची किमत हजारोंच्या घरात पाेचली आहे. (trending news earning 45 thousand rupees 1 rs old note check how)

ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर एक रुपयाच्या नोटेची तब्बल 45 हजार रुपयांना विक्री होत आहे. परंतु या नोटेवर 1957 मध्ये गव्हर्नर एचएम पटेल यांची सही असायला हवी. या नोटेचा सिरीयल क्रमांक 123456 आहे. या एक रुपयाच्या नोटेची Coinbazzar या संकेतस्थळावर विक्री होत आहे. येथे जुन्या 1 रुपयाच्या बंडलची मूळ किंमत 49,999 रुपये आहे. सवलतीनंतर संकेतस्थाळावर किंमत 44,999 रुपये इतकी आहे. यासाठी या संकेतस्थळाच्या शॉप सेक्शनमध्ये जावं लागेल. त्यानंतर "नोट बंडल" कॅटेगरीमध्ये गेल्यानंतर येथे संपूर्ण डिटेल्स पाहायला मिळतील.

26 वर्षांपूर्वी भारत सरकारने ही एक रुपयाची नोट चलनातून बंद केली होती. 1 जानेवारी 2015 मध्ये याची छपाई पुन्हा सुरू झाली. अनेकांकडे या नोटा अद्यापही आहेत. ज्या वर्षातील नोट हवी आहे, ती येथे खरेदी करता येऊ शकते. या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर एक नोट अशीही आहे, जी भारत देश स्वातंत्र्य होण्यापूर्वीची आहे आणि याची बोली सात लाख रुपयांपर्यंत लावण्यात आली आहे. अशाप्रकारच्या जुन्या नोटा तुमच्याकडेही असतील, तर तुम्हीही मोठी रक्कम कमावू शकता. अनेक वर्षांपूर्वीची 1, 10, 100 आणि 500 रुपयांच्या नोटांची ऑनलाईन बाजारात हजारो-लाखोंमध्ये विक्री होत आहे.

कुठे आणि कसं विकायचं नाणं?


जुनी नाणी किंवा नोटांच्या लिलावासाठी OLX अथवा India Mart ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तपासू शकता. येथे जुन्या नोटांची विक्री होते. या प्लॅटफॉर्मवर लॉगइन आयडी बनवावा लागेल. त्याशिवाय indiamart.com वरही अशाप्रकारे अकाऊंट बनवून लिलाव करुन पैसे कमावू शकता. लिलावासाठी तुमच्याकडे असलेल्या नोटेचा फोटो शेअर करावा लागेल. अनेक लोक अँटिक सामानाचीही खरेदी करतात. तर काही लोकांन जुन्या नोटांचा संग्रह करण्याची आवड असते. ते अशा नोटांचा शोध घेत असतात. एका हिंदी संकेतस्थळाने याबाबतचे वृत्त दिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT