Tripura Assembly Election Narendra Modi esakal
देश

PM Modi : पूर्वी एकाच पक्षाला झेंडा फडकवण्याची परवानगी होती, पण आता..; मोदींचा काँग्रेसवर पुन्हा निशाणा

त्रिपुरामध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी राजकीय पक्षांकडून सातत्यानं मोर्चेबांधणी सुरू आहे.

सकाळ डिजिटल टीम

काँग्रेस आणि कम्युनिस्टांच्या राजवटीनं अनेक दशकं त्रिपुराच्या विकासात अडथळा आणला. परंतु, भाजप सरकारनं त्रिपुरामध्ये विकास केला.

Tripura Assembly Election : त्रिपुरामध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी राजकीय पक्षांकडून सातत्यानं मोर्चेबांधणी सुरू आहे. याच भागात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) दौऱ्यावर आले आहेत.

दरम्यान, पंतप्रधान मोदी त्रिपुरातील अंबासा इथं विजय संकल्प रॅलीला संबोधित करत आहेत. पीएम मोदी म्हणाले, 'हिंसा आणि मागासलेपण ही आता त्रिपुराची ओळख राहिलेली नाही. त्रिपुरामध्ये यापूर्वी एकाच पक्षाला झेंडा फडकावण्याची परवानगी होती. मात्र, आज भाजप सरकारनं (BJP Government) त्रिपुराला भीती, दहशत आणि हिंसाचारातून मुक्त केलंय.'

PM मोदी म्हणाले, 'आम्ही आमच्या संकल्प पत्रात नवे ध्येय घेऊन नवी पावलं टाकण्याचं ठरवलंय. त्रिपुरामध्ये पूर्वी फक्त डाव्या विचारसरणीलाच सरकारी योजनांचा लाभ मिळत होता. मात्र, आता प्रत्येक नागरिकाला सरकारी योजनांचा लाभ मिळत आहे. भाजप सरकारनं राज्यात कायद्याचं राज्य प्रस्थापित केलंय.'

विरोधकांवर निशाणा साधत मोदी म्हणाले, काँग्रेस आणि कम्युनिस्टांच्या राजवटीनं अनेक दशकं त्रिपुराच्या विकासात अडथळा आणला. परंतु, भाजप सरकारनं त्रिपुरामध्ये विकास केला. हिंसाचार ही आता त्रिपुराची ओळख राहिलेली नाही. भाजपनं राज्याला भय आणि हिंसामुक्त केलं, असंही त्यांनी नमूद केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Female Doctor : ती बीडची आहे म्हणून जर... धनंजय मुंडे साताऱ्यातील महिला डॉक्टर प्रकरणावर नेमकं काय म्हणाले?

Local Megablock: मुंबईकरांनो लक्ष द्या! शनिवार आणि रविवारी मेगाब्लॉक; कधी अन् कुठे? जाणून घ्या

PMC Election 2025 : PMC निवडणुकीचा सस्पेन्स कायम! आरक्षणाची सोडत कधी? आयोगाने नियमावली दिली, पण तारीख गुलदस्त्यातच

Dr Ajay Chandanwale : डॉ. अजय चंदनवाले यांची एमयुएचएसच्या कुलगुरूपदी नियुक्ती

Unseasonal Rain : शेतकरी संकटात..! अंबडमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा आणि वेचणीसाठी मजूर मिळेना, दुहेरी पेच

SCROLL FOR NEXT