Sudip Roy Burman and Ashish Kumar Joins Congress Party esakal
देश

'या' राज्यात भाजपला मोठा झटका; दोन आमदारांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

सकाळ डिजिटल टीम

'भाजपात सर्वांचाच भ्रमनिरास झालाय. गुजरात, हिमाचल सोबत त्रिपुरामध्येही निवडणूक होण्याची शक्यता आहे.'

भारतीय जनता पक्षाचे (Bharatiya Janata Party) आमदार सुदीप रॉय बर्मन (Sudip Roy Burman) आणि आशिष साहा यांनी काल त्रिपुरा विधानसभेचा (Tripura Assembly Election) राजीनामा देत भाजपला सोडचिठ्ठी दिलीय. या दोन्ही आमदारांनी पक्षाच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिलाय. सुदीप रॉय बर्मन आणि आशिषकुमार साहा (Ashish Kumar Saha) यांनी नुकताच काँग्रेस प्रवेश केला. काँग्रेसमध्ये (Congress) प्रवेश केल्यानंतर सुदीप रॉय म्हणाले, भाजपमधील अनेक आमदार काँग्रेसमध्ये सामील होण्याच्या तयार आहेत. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळं त्यांना आणखी काही महिने वाट पहावी लागणार आहे. (Sudip Roy Burman and Ashish Kumar Joins Congress Party)

भाजप पक्षात (BJP) सर्वांचाच भ्रमनिरास झालाय. मला वाटतं, गुजरात (Gujarat) आणि हिमाचल सोबत त्रिपुरामध्येही (Tripura) निवडणूक होण्याची चिन्हं आहेत, असं ते म्हणाले. दोन्ही आमदारांच्या या राजीनाम्यानंतर 60 सदस्यीय विधानसभेत भाजपचं संख्याबळ 33 वर आलंय. सुदीप रॉय बर्मन पुढे म्हणाले, राज्यात लोकशाही नाही. इथं लोकांचा श्वास गुदमरतोय, अशी टीका त्यांनी केलीय.

यापूर्वी 29 जानेवारीला भाजपचे बंडखोर आमदार सुदीप रॉय बर्मन यांनी त्रिपुरा सरकारवर हल्लाबोल केला होता. ते म्हणाले होते, राज्यात लोकशाही नाही. इथं लोकांचा श्वास कोंडला जात आहे. तसेच, पक्ष सोडण्याच्या प्रश्नावर त्यांनी आपल्या जनतेला विचारल्यानंतरच आपलं भविष्य ठरवू, असं सांगितलं होतं. त्रिपुरामध्ये 2023 मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. सुदीप रॉय हे त्रिपुरा सरकारमध्ये माजी मंत्री राहिले आहेत. पक्षविरोधी कारवायांमुळं त्यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. काल त्यांनी भाजपवर निशाणा साधत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palghar News: श्वानाच्या पिल्लाला बिबट्याचे अभय, बावड्या गावातील घटना सीसीटीव्हीत कैद

अमित ठाकरेंविरोधात BJP आक्रमक, माहीममध्ये भाजप-मनसे कार्यकर्ते आमनेसामने, पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात

Mamata Banerjee Relative Death : ममता बॅनर्जींच्या नातेवाईक महिलेचा संशयास्पद मृत्यू; पतीसोबत सुरू होता घटस्फोटाचा खटला

१०२ पेक्षा जास्त ताप तरीही निवेदिता सराफ यांनी केलं 'कृष्णाईच्या लेकी'चं शूटिंग; अभिनेत्याच्या हातालाही होती सलाइन

Maharashtra Cabinet Decisions : मंत्रिमंडळ बैठकीवर तुकाराम मुंढेंचा प्रभाव चार महत्त्वाचे निर्णय; एकनाथ शिंदे यांची अनुपस्थिती

SCROLL FOR NEXT