haryana accident Sakal
देश

धावता ट्रक डिव्हायडरवर घुसला अन् ३ जणांचा घेतला बळी

हरियाणाच्या झज्जर जिल्ह्यातील KMP म्हणजेच कुंडली-मानेसर-पलवल एक्सप्रेसवेवर हा अपघात झाला.

सकाळ डिजिटल टीम

चंदीगड : हरियाणाच्या झज्जर जिल्ह्यातील KMP म्हणजेच कुंडली-मानेसर-पलवल एक्सप्रेसवेवर झालेल्या अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात १० जण गंभीर जखमी झाले असून जखमींनी उपचारासाठी रोहतकमधील एका हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं.

(KMP Expressway Accident)

हरियाणातील झज्जर जिल्ह्यातील आसोदा टोलनाक्याजवळ कुंडली-मानेसर-पलवल एक्सप्रेसवेवर दुरुस्तीचे काम सुरु असताना हा अपघात घडला. रस्त्याचे काम करणारे कर्मचारी थकून रस्त्याच्या कडेला झोपले होते. तेव्हा पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटून झोपलेल्या कर्मचाऱ्यांच्या अंगावर गेला. या घटनेनंतर आरडाओरड झाली आणि अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमींना तात्काळ रूग्णालयात दाखल केले असून मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याचं सांगितलं आहे.

या अपघातात ट्रक दुभाजकाला धडकून सुमारे १४ लोकांच्या अंगावर गेला होता. त्यामधील ३ लोकांचा मृत्यू झाला असून बाकीच्या जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या अपघातात ट्रकचेही नुकसान झाले आहे.

हे सर्व मजूर केएमपी एक्स्प्रेस वेवर काम करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हे लोक विश्रांतीसाठी रस्त्याच्या कडेला झोपले होते. यादरम्यान एक भरधाव ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि आणि झोपलेल्या लोकांना धडक दिली.

"या अपघातातील काही लोक बचावले असून त्यांचे प्राण वाचवण्यात आले आहेत. मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी बहादुरगड सामान्य रुग्णालयात पाठवले आहे. आसोदा टोलनाक्याजवळ हा अपघात झाला असून पुढील तपास सुरू आहे." असं पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कारला धडकल्यानंतर पिकअपला लागली आग; तिघांचा होरपळून मृत्यू, एक जण गंभीर जखमी

Latest Marathi News Live Update : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांची आज कोल्हापुरात महासभा

Supreme Court : 'its very serious issue' सर्वोच्च न्यायालयात वकिलांमध्ये जोरदार युक्तिवाद, CJI सूर्यकांतही संतापले, खटला अतिशय गंभीर

Maharashtra Winter Update : राज्यातील थंडी गायब की गारठा कायम राहणार? हवामान विभागाचा महत्त्वाचा अंदाज समोर

Semiconductor : सेमीकंडक्टरच्या क्षेत्रामध्ये ‘स्वदेशी’ झेप; मायक्रोप्रोसेसर ‘ध्रुव-६४’चे लाँचिंग, ‘सीडॅक’ने बनविला आराखडा

SCROLL FOR NEXT