Trucks Carrying Cash Esakal
देश

Trucks Carrying Cash: चार ट्रक, हजारो कोटींच्या मळलेल्या नोटा अन् पोलीस; वाचा चित्रपटालाही लाजवेल असे थरारनाट्य

Andhra Pradesh Cash: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू असल्याने ट्रक ताब्यात घेण्यात आले. आंध्र प्रदेशात संसदीय आणि विधानसभा निवडणुकांसाठी एकाच वेळी १३ मे रोजी मतदान होणार आहे.

आशुतोष मसगौंडे

2,000 कोटी रुपयांच्या मळलेल्या चलनी नोटा घेऊन जाणारे चार कंटेनर ट्रक गुरुवारी रात्री आंध्र प्रदेश पोलिसांनी येथे ताब्यात घेतले परंतु नंतर ते बँकांचे असल्याने समोर आल्यानंतर सोडून देण्यात आले, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

दरम्यान कागदपत्रांच्या पडताळणीनंतर हे नोटांनी भरलेले ट्रक सोडण्यात आले आणि या चलनी नोटा ICICI, IDBI आणि फेडरल बँकेच्या असल्याचे, अनंतपूर रेंजचे पोलीस उपमहानिरीक्षक आर एन अम्मी रेड्डी यांनी सांगितले.

अधिकाऱ्याने सांगितले की, केरळहून आलेले ट्रक हैदराबादमधील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) प्रादेशिक कार्यालयाकडे जात होते. (Trucks Carrying Cash Detained In Andhra Pradesh)

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू असल्याने ट्रक ताब्यात घेण्यात आले. आंध्र प्रदेशात संसदीय आणि विधानसभा निवडणुकांसाठी एकाच वेळी १३ मे रोजी मतदान होणार आहे.

“मुळात या चार ट्रकमधील मळलेल्या नोटा आयसीआयसीआय, आयडीबीआय आणि फेडरल बँक यांच्या मालकीच्या होत्या आणि त्याची रक्कम 2,000 कोटी रुपये होती. त्या कोचीहून आरबीआय, हैदराबाद येथे नेल्या जात होत्या,” असे रेड्डी यांनी पीटीआयला सांगितले.

या ट्रकसोबत काही वाहने होती त्यामध्ये या नोटा घेऊन जाण्यासाठी लागणार सर्व आवश्यक ट्रान्झिट कागदपत्रे होती. ती पोलिसांना उपलब्ध करून देण्यात आली होती, असे पोलीस उपमहानिरीक्षक रेड्डी म्हणाले.

दरम्यान या नोटा त्यांच्याच असल्याची खात्री करण्यासाठी संबंधित बँका आणि आरबीआयकडे पडताळणी करण्यात आल्यानंतर त्या सोडण्यात आल्या.

यावेळी आयकर विभागाचे अधिकारी, निवडणूक रिटर्निंग अधिकारी आणि इतर महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना पडताळणी प्रक्रियेत सहभागी करण्यात आले होते, असे अधिकाऱ्याने सांगितले.

रेड्डी म्हणाले की, या चलनी नोटा केरळहून हैदराबातमध्ये आणल्या जात आहेत, याची कोणतीही माहिती आंध्र प्रदेश पोलिसांना देण्यात आली नव्हते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

U19 Asia Cup: भारताचा सलग तिसरा विजय! आधी अभिज्ञान कुंडूने द्विशतक करत चोपलं अन् मग दीपेशने ५ विकेट्स घेत मलेशियाचा उडवला धुव्वा

SSC And HSC Board Exam: महत्त्वाची बातमी! डिजिटल मार्कशीटसाठी दहावी-बारावी विद्यार्थ्यांना 'APAAR ID' नोंदणी करणं बंधनकारक

Palghar Bribery Case : नवापूरचा ग्रामसेवक लाच घेताना अटकेत; कृषी पर्यटन परवान्यासाठी २० हजारांची मागणी!

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत शेतकऱ्यांनी कापणी केलेले धान पंचवीस दिवसांपासून रस्त्यावरच

Buldhana Accident : लेकीनं डॉक्टर व्हायचं स्वप्न पाहिलं, पण अपघाताने होत्याचं नव्हतं केलं; आई-बाबांना करावे लागले अंत्यसंस्कार...

SCROLL FOR NEXT