twitter
twitter 
देश

केंद्राचा ट्विटरला दणका! कंपनीने कायदेशीर संरक्षण गमावले

कार्तिक पुजारी

केंद्र सरकारने सोशल मीडियासाठी नवे आयटी नियम आणले आहेत. ज्याचे पालन करणे सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला अनिवार्य आहे.

नवी दिल्ली- गेल्या काही दिवसांपासून मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटर आणि केंद्र सरकारमध्ये वादाची स्थिती आहे. केंद्र सरकारने सोशल मीडियासाठी नवे आयटी नियम आणले आहेत. ज्याचे पालन करणे सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला अनिवार्य आहे. फेसबुक, व्हॉट्सऍप, गूगल, इन्स्टाग्रामसारख्या कंपन्यांनी या नियमांचे पालन करण्याची तयारी दाखवली आहे. पण, ट्विटर इंडिया याबाबत चालढकल करत असल्याने तणावाची स्थिती आहे. त्यातच आता ट्विटरला मोठा झटका बसला आहे. केंद्र सरकारने ट्विटरला असलेले कायदेशीर संरक्षण काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. (Twitter loses legal protection, fails to comply with new IT rules)

माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 79 अंतर्गत थर्ड पार्टी मजकुराबाबत सोशल मीडिया कंपन्यांना संरक्षण मिळत होते. याचा अर्थ, एखाद्याने काही आक्षेपार्ह पोस्ट केली तर त्यासाठी त्या व्यक्तीला जबाबदार धरलं जायचं. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कंपनीचे याबाबत काही उत्तरदायीत्व नसायचं. पण, ट्विटरकडून नव्या आयटी नियमांचे पालन झाले नसल्याने त्यांना कलम 79 अंतर्गत मिळणारे संरक्षण रद्द झाले आहे. त्यामुळे ट्विटरवर केल्या जाणाऱ्या प्रत्येक पोस्टसाठी कंपनीलाही जबाबदार धरलं जाणार आहे.

कोर्टात याप्रकरणी तक्रार गेल्यास ट्विटरला आता कलम 79 अंतर्गत कसलेही संरक्षण मिळणार नाही. 26 मेनंतर दाखल होणाऱ्या तक्रारीबाबत ट्विटरला अलिप्त राहता येणार नाही. आम्ही केवळ मध्यस्थ आहोत असं स्पष्टीकरण ट्विटरला देता येणार नाही. विशेष म्हणजे ट्विटरविरोधात भारतात पहिली तक्रार दाखल झाली आहे. गाझीयाबादमध्ये एका मुस्लीम व्यक्तीला मारहाण आणि दाढी कापल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. याला धार्मिक रंग असल्याचा दावा करण्यात आला होता. पण, पोलिसांनी सदर घटना धार्मिक भावनेने प्रेरित नसल्याचं स्पष्ट केलंय. शिवाय ट्विटरसह 9 जणांविरोधात एफआयर दाखल केला आहे. ट्विटरने व्हिडिओ व्हायरल होण्यापासून रोखलं नाही, असा आरोप पोलिसांनी तक्रारीत केला आहे.

माहिती तंत्रज्ञानसंबंधी नवे नियम 25 मेपासून अंमलात आले आहेत. सरकारने सांगितलं की, ''सद्भावना म्हणून आम्ही ट्विटरला वाढीव मुदत दिली होती. पण, ट्विटरने अंतिम तारेखनंतरही नियमांची अंमलबजावणी केली नाही.'' केंद्राने सोशल मीडिया कंपन्यांना एका नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करण्यास सांगितलं होतं. पोस्टसंबंधी तक्रारीचे निवारण करण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यावर असणार आहे. दरम्यान, ट्विटरने अधिकाऱ्याची नेमणूक करण्याची तयारी केली असून लवकरच माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला याची माहिती दिली जाईल, असं म्हटलंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kiran Sarnaik: आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील ४ जणांचा अपघातात मृत्यू! पातूरमध्ये भीषण अपघात

Pune Traffic Update: उद्यापासून पुणे वाहतुकीत गर्डर लॉचिंग कामामुळे मोठे बदल, कोणते असतील पर्याय मार्ग?

Kapil Sharma : 'द ग्रेट इंडियन कपिल शो'साठी कपिल शर्मा घेतो 'इतकं' मानधन !

Chitra Wagh: "चित्रा वाघ यांनी माफी मागावी अन्यथा..."; 'पॉर्नस्टार' प्रकरणावर अभिनेत्याचा गंभीर इशारा

RBI: गुंतवणूकदार मालामाल! रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत

SCROLL FOR NEXT