Twitter war between sanjay Raut and Chhatrapati Sambhaji Raje 
देश

उद्धवजी, राऊताच्या जिभेला लगाम घाला; संभाजीराजेंकडून अरेतुरेची भाषा

सकाळ डिजिटल टीम

पुणे : उद्धवजी, राऊतांच्या जिभेला लगाम घाला, असे संभाजीराजे यांनी राऊत यांच्या ट्विटला उत्तर दिले आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनीही उत्तर दिले असून कोल्हापूरचे खासदार छत्रपती संभाजीराजे आणि राऊत यांच्यात ट्विटरयुद्ध सुरु झालेले पाहायला मिळाले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करत भारतीय जनता पक्षाने आज (ता.१२) आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे. यावरून शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी सातारा गादीचे वारसदार श्रीमंत उदयनराजे श्रीमंत शिवेंद्रराजे कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे यांना हे मान्य आहे का? शिवरायांच्या वंशजांनो बोला, असा प्रश्न त्यांनी केला होता, याला उत्तर म्हणून कोल्हापूरचे खा. छत्रपती संभाजीराजे यांनी उत्तर देताना उद्धव जी त्या संजय राउतांच्या जिभेला लगाम घाला. प्रत्येक वेळी छत्रपती घरण्यावर गरळ ओकून राजकारण करतोय. त्याने आधी माहिती घ्यायला पाहिजे होती, की मी जिजाऊ जयंती, सिंदखेडराजामध्ये काय बोललो आहे ते. त्याची मुजोरी सहन केली जाणार नाही, अशा शब्दात छत्रपती संभाजी यांनी ट्विट केले आहे. 

छत्रपती संभाजी यांच्या ट्विटला उत्तर देताना संजय राऊत यांनी मा.छत्रपती संभाजी राजे आम्ही आपला नेहमीच आदर करतो. संजय राऊत यांनी असे कोणते विधान केले? ज्यामुळे छत्रपती घराण्याचा अवमान झाला? हे राज्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने चालत आहे. सदैव चालत राहिल. धन्यवाद आणि जय महाराष्ट्र अशा आशयाचे ट्विट केले आहे. यावरून संजय राऊत आणि छत्रपती संभाजी यांच्यात चांगलेच ट्विटरयुद्ध रंगलेले पाहायला मिळाले.

तत्पूर्वी, छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीही करणं खपवून घेतलं जाणार नाही. नरेंद्र मोदी हे स्वकर्तृत्वाने पंतप्रधान झाले आहेत, पण त्यांची शिवाजी महाराजांशी तुलना करणं माझ्यासाहित सर्वच  शिवभक्तांना अजिबात आवडलेलं नसल्याचे छत्रपती संभाजी यांनी म्हटले आहे. ज्या पक्षाच्या कार्यालयात ह्या पुस्तकाचे प्रकाशन झाले, त्या पक्षाच्या अध्यक्षांनी ते पुस्तक तात्काळ मागे घ्यावे. नाहीतर त्याचे वेगळे परिणाम होतील, असा इशाराही छत्रपती संभाजी यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP Sangli Crisis : सांगलीच्या राजकारणात खळबळ! 'राष्ट्रवादी'च्या 35 जणांचे राजीनामे; मैनुद्दीन बागवान यांच्याविरोधात बंड, स्वीकृत निवडीचा वाद

Pune Crime: उरुळीकांचनमध्ये गंभीर घटना; अल्पवयीन मुलावर जबरदस्तीचा प्रयत्न, POCSO कायद्यान्वये कारवाई!

Latest Marathi News Live Update : राळेगाव शहरात हिंदुत्ववादी संघटने कडून जोरदार घोषणाबाजी

Mobile Booster Tips : तुमचा मोबाईल सतत हँग होतोय? स्लो फोनला ५ मिनिटांत बनवा सुपरफास्ट, एकदा वापरून पाहा 'ही' सोपी ट्रिक

Nagpur News: उन्हाळ्यात ताडगोळे आरोग्यासाठी लाभदायक; शरीरातील उष्णतामान कमी करण्यासाठी होते मदत

SCROLL FOR NEXT