Twitter war between Swara Bhaskar and Vivek Agnihotri 
देश

दिग्दर्शक स्वराला म्हणाला, 'तुम्हाला कोणीतरी चुकीच्या ड्रग डिलरचा नंबर दिलाय'

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : जामिया इस्लामिया लाठीचार्ज प्रकरण दररोज वेगळे वळण घेत आहे. येथील विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीचार्जचा निषेध देशभरातून होत असतानाच, सोशल मीडियावरही त्याचे पडसाद उमटत आहेत. बॉलिवूड कलाकार- निर्माते दिग्दर्शकांनीही या आंदोलनात उडी घेतली आहे. प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे या विषयावरून वाद-विवाद होताना दिसत आहेत. अशातच सोशल मीडियावर दररोज कोणी ना कोणी या विषयावरून वाद घालताना दिसतात. अशातच अभिनेत्री स्वरा भास्कर पुन्हा एकदा ट्विटरवॉरवरून चर्चेत आलीये. 

फिल्ममेकर, निर्माते विवेक अग्निहोत्री आणि स्वरा भास्कर यांच्यात जामिया लिमिया लाठीचार्ज प्रकरणावरून पुन्हा एकदा ट्विटरवर वाद झाला आहे. स्वराने ट्विट केले होते की, 'हिंसाचार हा चुकीचाच आहे. आंदोनकांना शांततेत आंदोलन करण्यास सांगा. कोणालाही हुसकावून लावू नका. तुमच्या आजूबाजूला कोण हिंसाचार करताना दिसल्यास त्यांना थांबवा.' यावर रिप्लाय देत विवेक अग्निहोत्री म्हणतात, 'जेव्हा तुमचे हात निष्पाप लोकांच्या रक्ताने माखतात 'जेव्हा आपले हात निरपराध लोकांच्या रक्ताने लाल असतात. आपण वर्षभर आपल्या द्वेषाने लोकांना चिथावणी देऊ शकत नाही आणि विभाजित करू शकत नाही आणि आता उघड झाल्यावर अशा पोस्ट्स लिहित आहात. ढोंगीपणा चालणार नाही.' असे ट्विट केले. 

यावर स्वराने त्यांना 'ड्रग्ज?????' असे लिहित प्रश्न विचारला. त्यावर विवेक यांनी पुन्हा रिप्लाय दिला, की, 'नाही, तुम्हाला कोणीतरी चुकीच्या ड्रग डिलरचा नंबरला दिला आहे.' त्यांच्या या ट्विटवॉरमुळे स्वरा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 

जामिया मिलिया प्रकरणात सोशल मीडिया मोठी भूमिका बजावत आहे. यात अनेक कलाकारांनी या आंदोलनाला समर्थन दिले आहे. यात सोनाक्षी सिन्हा, हुमा कुरेशी, विकी कौशल, स्वरा भास्कर अनुराग कश्यप यांनी आंदोलनाला समर्थन दिले.     

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray UPI : युपीआयवरील MDR म्हणजे ‘डिजिटल सापळा’; राज ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल, व्यापाऱ्यांना शुल्क न भरण्याचं आवाहन

पदराने अचानक पेट घेतला, केसांपर्यंत आग गेली! जुई गडकरीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग, म्हणाली...'पाठीला जोरात चटका बसला अन्...'

कौटुंबिक वाद विकोपाला! भांडणात पतीच्या गुप्तांगाला चावा घेतला, संतापलेल्या पतीने पत्नीचं थेट नाक कापलं; घटनेने खळबळ

Iran Execution : इराणने मोसादच्या गुप्तहेराला दिली फाशी, इस्त्रायलला संवेदनशील लष्करी माहिती पुरवल्याचा आरोप

Mumbai: लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी रांगेत थांबलेल्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू; जळगावच्या जयदीप नेमाडे यांचा दुर्दैवी अंत

SCROLL FOR NEXT