two anti hiv drugs used for coronavirus patients jaipur india 
देश

भारतात पहिला प्रयोग : एड्सवरील दोन औषधे वापरून कोरोना रुग्णांवर उपचार

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : एचआयव्हीच्या रुग्णांवरील उपचारांसाठी वापरल्या जाणारी दोन औषधे आता एकत्रितपणे कोरोना व्हायरसच्या रुग्णांवरील उपचारांसाठी वापरली जात असून, अशा प्रकारची भारतातील ही पहिलीच घटना आहे. ‘कोव्हीड-१९’ अर्थात कोरोनाची लागण झालेल्या इटालियन दांपत्यावर जयपूरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दांपत्याला ही औषधे दिली जात आहे. 

भारताच्या औषध महानियंत्रकांची परवानगी घेण्यात आली आहे. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या भारतात वाढत असल्याचा पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. एचआयव्हीच्या रुग्णांवरील दुसऱ्या टप्प्यातील उपचारांमध्ये लोपिनावीर आणि रिटोनावीर ही दोन औषधे जगभर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वापरली जातात. जयपूरमध्ये इटालियन दांपत्यावरील उपचारांमध्ये या दोन्ही औषधांचा एकत्रितपणे वापर केला जातो आहे. या औषधांच्या मर्यादीत वापराला भारताच्या औषध नियंत्रकांनी परवानगी दिली आहे. कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या पाहता या औषधांच्या वापरासाठी तातडीने परवानगी देण्याची मागणी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) केली होती. 

रुग्णांची अनुमती घेऊन उपचार
एसएमएस रुग्णालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. डी. एस. मीना यांनी सांगितले की, इटालियन दांपत्याला श्वसनाक्रियेत तीव्र स्वरुपातील समस्या निर्माण झाल्यानंतर या दोन्ही औषधांचा एकत्रित वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी संबंधित रुग्णांची संमती घेण्यात आली आहे.

कोरोनाग्रस्त रुग्ण आहे डॉक्टर 
कोरोनाग्रस्त इटालियन व्यक्ती स्वतः डॉक्टर असून, त्यांना कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवण्यात आले आहे. त्यांना कोरोनाची लागण होण्यापूर्वीपासून श्वसनाची समस्या आहे. त्यांची प्रकृती गंभीर बनल्यानंतर वरील दोन्ही औषधे त्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. आता संबंधित रुग्णाची प्रकृती स्थिर असून, त्यांच्या पत्नीची प्रकृती सुधारली आहे. या दोन औषधांच्या चाचण्या चीनमध्येही घेण्यात आल्या असून, कोरोनाच्या रुग्णांसाठी त्याचा वापर केला जात आहे. थायलंडमध्येही कोरोना बाधितांवरील उपचारांसाठी ही औषधे वापरली जात आहेत. भारतात आलेले १६ इटालियन पर्यटक आणि त्यांचा गाईड यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये दुष्काळाचं सावट; दर मिळत नसल्याने शेतकऱ्याने दोन एकर केळीची बाग केली उद्ध्वस्त

Babar Azam : बाबर आझम पुन्हा स्वस्तात बाद, बाऊंड्रीवरच चाहत्यांनी त्याला घेरले, सपोर्ट स्टाफ पळत आला अन्... Video Viral

SCROLL FOR NEXT