lahaul spiti esakal
देश

ट्रेकिंग करताना दोघांचा मृत्यू; हिमाचल ग्लेशिअरमधील घटना

सकाळ डिजिटल टीम

केलाँग (हिमाचल प्रदेश) : हिमाचल प्रदेशातील 'लाहौल स्पीती' भागातील 'खंमीगर ग्लेशिअर' दोन ट्रेकर्सचा थंडीने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तसेच अनेक ट्रेकर्स अडकून पडल्याची माहिती मिळतेय. १८ जणांच्या ट्रेकर्सचा गट या भागात ट्रेकिंगसाठी गेला असताना ही घटना घडली.

१४ सदस्य अडकले; हेलिकॉप्टरही या भागात पोहचू शकत नाही

या गटातील दोन जण सुरक्षित ठिकाणी परतले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. तर अद्याप १४ सदस्य बर्फाच्छादित भागात अडकून पडले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 'इंडियन माऊंटेनिअरिंग फाऊंडेशन, पश्चिम बंगाल'चा सहा सदस्यीय गट ''खंमीगर ग्लेशिअर' - 'काजा' येथे ट्रेकिंगसाठी गेला होता. खंमीगर ग्लेशिअर जमिनीपासून जवळपास ५०३४ मीटर उंचीवर आहे. या दलासोबत ११ पोर्टर आणि एक स्थानिक गाईड हेदेखील सहभागी झाले होते. तीन दिवसांपूर्वी अचानक मोठी बर्फवृष्टी झाल्यानंतर हे सगळे जण खंमीगर ग्लेशिअर भागात अडकून पडले. प्रचंड थंडीत निभाव न लागल्यानं पश्चिम बंगालचे रहिवासी भास्कर देव (६१ वर्ष) आणि संदीप कुमार ठाकुरता (३८ वर्ष) या दोघांचा जागीच मृत्यू झाल्याचं समजतंय. दरम्यान, बंगालचाच रहिवासी असलेल्या ४२ वर्षीय अतुलनं एका पोर्टरसोबत 'काजा' गाठून या घटनेची माहिती स्थानिक प्रशासनाला दिली.

सुरक्षा दलाची ३२ जणांची एक टीम

देवाशीष वर्धन (५८ वर्ष), रणधीर राय रामकृष्ण (६३ वर्ष), तपस कुमार दास (५० वर्ष) अशी इथं अडकून पडलेल्या बंगालच्या नागरिकांची नावं आहेत. यासोबत पोर्टरही इथं अडकून पडले आहेत. भौगोलिक परिस्थितीच्या अडथळ्यामुळे हेलिकॉप्टर या भागात पोहचू शकत नाही. त्यामुळे, या सदस्यांना बाहेर काढण्यासाठी सुरक्षा दलानं ३२ जणांची एक टीम तयार केली आहे. यामध्ये १६ आयटीबीपी जवान आणि सहा डोगरा स्काऊट जवानांचा समावेश आहे. तसंच यात एका डॉक्टर आणि १० पोर्टरलाही सहभागी करून घेण्यात आलंय. बचाव गटाला खंमीगर ग्लेशिअरपर्यंत पोहचण्यासाठीच तीन दिवसांचा वेळ लागणार आहे. पहिल्या दिवशी (२८ सप्टेंबर) काह ते चंकथांगो, दुसऱ्या दिवशी चंकथांगो ते धार थांगो आणि तिसऱ्या दिवशी धार थांगो ते खंमीगर ग्लेशिअर असा प्रवास ही रेस्क्यू टीम करणार आहे. त्यानंतर पुन्हा खंमीगर ग्लेशियर ते काह या प्रवासासाठी आणखीन तीन दिवस लागण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : शिवसेना पक्ष, चिन्ह संदर्भात उद्या सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी

Atiq Ahmed Son Accident Video: अतिक अहमदच्या मुलाचा अपघात कसा झाला? कार डिव्हायडरला धडकली अन् हवेत उडाली, Live Video Viral

Scam 2010 Marathi Actor: SCAM 2010 मध्ये झळकणार मराठमोळा चेहरा; तुम्ही ओळखलंत का या अभिनेत्याला? पत्नी गाजवतेय मराठी मालिका

YCMOU Exam: धक्कादायक! एकाच विद्यार्थ्याने एकाच वेळी दिल्या दोन परीक्षा, 'मुक्त'च्या परीक्षेत ४० जणांचा प्रताप; विद्यापीठाकडून दखल

Ethanol Production Restrictions: उसापासून इथेनॉल निर्मितीवर निर्बंध?; साखरेचे भाव नियंत्रणासाठी उत्पादन वाढविणार

SCROLL FOR NEXT