two sadhus killed inside temple in up accused arrested 
देश

दोन साधूंची हत्या; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

वृत्तसंस्था

बुलंदशहर (उत्तर प्रदेश): बुलंदशहरामध्ये दोन साधूंची गळा दाबून हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, बुलंदशहर जिल्ह्यातील पगोना गावातील शिव मंदिरात गेल्या 10 वर्षांपासून जगनदास आणि सेवादास हे दोन साधू वास्तव्यास होते. मंदिरातील धार्मिक विधी करत होते. सोमवारी (ता. 27) मध्यरात्री मंदिर परिसरात दोघांची हत्या करण्यात आली. आज (मंगळवार) सकाळी गावातील भाविक मंदिरात दर्शनासाठी आल्यानंतर ही घटना समोर आली. साधूंच्या हत्येची माहिती परिसरात पसरल्यानंतर घटनास्थळी गर्दी झाली होती. साधूंनी चिमटा नेल्याची तक्रार केल्यावर काही व्यसनी तरुणांनी त्यांचा खून केल्याची माहिती पुढे आली आहे.

पोलिसांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर तत्काळ घटनास्थळी हजर झाले. घटनास्थळावरून मृतदेह ताब्यात घेऊ शवविच्छेदन अहवालासाठी रुग्णालयात पाठवले. तपासादरम्यान मुरारी नावाच्या युवकाला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, पालघरमध्येही (महाराष्ट्र) दोन साधू आणि चालकाची जमावाने दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी 101 लोकांना अटकही करण्यात आली आहे. या घटनेनंतर उत्तर प्रदेशात साधूंची हत्या झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT