two youth burn child alive in chattisgarh 
देश

विद्यार्थीनीने विरोध केला म्हणून जाळले जिवंत...

वृत्तसंस्था

बेमेतारा (छत्तीसगड): एका 14 वर्षीय विद्यार्थीनीवर गावातील दोन विद्यार्थ्यांनी बलात्काराचा प्रयत्न केला होता. मात्र, विद्यार्थीनीने त्यांचा प्रयत्न हाणून पाडल्यामुळे त्यांनी तिला पेटवून दिले. 80 टक्के भाजलेल्या विद्यार्थीनीचा उपचारादरम्यान मृ्त्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

छत्तीसगडमधील बेमेतारा जिल्ह्यात ही घटना घडली आहे. पीडित विद्यार्थीनी आणि पेटवून देणारे विद्यार्थी एकाच शाळेत शिक्षण घेत असून, ते पुढील वर्गातील आहेत. मृत्यूपूर्वी पीडित विद्यार्थीनीने गावातील दोघांनी बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पोलिसांना दिली होती. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 जून रोजी दाढी पोलिस स्टेशन भागात दोघांनी एका मुलीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळाली होती. गंभीर जखमी झालेल्या मुलीला उपचारासाठी रायपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात जाऊन तिच्याकडून माहिती घेण्यात आली होती. यावेळी दोघांनी बलात्काराचा प्रयत्न केला होता. विरोध केल्यामुळे त्यांनी जाळल्याचे तिने सांगितले. पण, उपचारादरम्यान पीडित विद्यार्थीनीचा बुधवारी (ता. 24) मृत्यू झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, दोघांना अटक करण्यात आली असून, त्यांची चौकशी सुरू आहे. पीडित मुलीच्या घराजवळ त्यांनी पेटवून दिले होते. मुलीचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Price: तेल स्वस्त झालं, पण पंपावर दर कायम! इंधनाचे भाव का कमी होत नाहीत? जाणून घ्या नेमकी कारणं...

Pune Civic Burden: माजी नगरसेवकांच्या कुटुंबीयांच्या उपचाराचा खर्च महापालिका उचलणार; पुणेकरांच्या खिशाला आणखी फटका

Pune News: विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! डॉ. आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहातील भोजन भत्ता वाढला; थेट खात्यात जमा होणार रक्कम

Indrayani Pollution: वारीच्या तोंडावर इंद्रायणी पुन्हा फेसाळली; रसायनयुक्त सांडपाण्यामुळे वारकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न

Nandurbar News: २१व्या शतकातील कटू वास्तव! अपूर्ण पुलामुळे गर्भवतीला बांबूच्या झोळीतून नदी पार; प्रसूतीसाठी जीवघेणा प्रवास

SCROLL FOR NEXT