uber 
देश

कोरोना प्रभाव! उबरने तब्बल इतक्या कर्मचाऱ्यांना दाखवला घरचा रस्ता

वृत्तसंस्था

दिल्ली- कोरोना महामारीमुळे जगभरात असामान्य आणि अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक देशांनी लॉकडाऊनचा अवलंब केला. त्यामुळे अनेक उद्योगधंदे आणि सेवाक्षेत्रे ठप्प पडली. परिणामी सर्व देशांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. अशात कॅब सुविधा पुरवणारी प्रसिद्ध कंपनी उबर इंडियाने कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला आहे. 

उबर इंडिया आणि दक्षिण आशियाचे अध्यक्ष प्रदिप परमेस्वरन यांनी याबाबतची माहिती दिली आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर पूर्णवेळ काम करणाऱ्या 600 कर्मचाऱ्यांना उबर कामावरुन काढणार आहे. एकूण कर्मचारी संख्येच्या 25 टक्के इतकी ही संख्या आहे. कामावरुन कमी केलेल्यांमध्ये ड्राईवर, राईडर सपोर्ट अशा कर्मचाऱ्यांचा समावेश असणार असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

कोरोनामुळे लादण्यात आलेल्या लॉकडाऊनमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न होत असताना उबरचा हा निर्णय आला आहे. कोरोना महामारीने उद्भवलेल्या परिस्थितीमुळे अर्थव्यवस्थेची गती पूर्णपणे थांबली आहे. त्यामुळे अनेक व्यावयायिकांना कामगार कपातीचा कठोर निर्णय घ्यावा लागत आहे. तसेच अनेक कर्मचारी नौकरी जाण्याच्या भीतीखाली वावरत आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

उबरमधून ज्या कर्मचाऱ्यांना कामावरुन काढण्यात आले त्यांना 10 आठवड्य़ांची पगार देण्यात येणार आहे. तसेच अशा कर्मचाऱ्यांना पुढील सहा महिन्यांसाठी आरोग्य विमा दिला जाणार आहे. याबरोबर या लोकांना इतर ठिकाणी काम मिळावे यासाठी कंपनी मदत करणार आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात सुरु असलेल्या सलग चौथ्या लॉकडाऊनमुळे कॅब सेवा पूर्णपणे बंद आहे. तसेच पुढचा काळही अनिश्चिततेचा आहे. त्यामुळे कर्मचारी कपातीशिवाय आमच्याकडे अन्य कोणताही पर्याय नव्हता, असं परमेस्वरन म्हणाले आहेत. आज उबर कुटुंब आणि आम्हा सर्वांना सोडून जाणारे सहयोगी यांच्यासाठी निश्चितच दु:खद दिवस आहे, असंही ते म्हणाले आहेत.

कर्मचारी कपात ही या अगोदर घोषीत केलेल्या वैश्विक कामगार कपातीचा भाग असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. गेल्या आठवड्यात अमेरिका स्थित उबर टेक्नोलॉजीने (जी की उबर इंडियाची मुळ कंपनी आहे) कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर 23 टक्के कामगार कपातीची घोषणा केली होती. 

दरम्यान, कोरोना महामारीचे वाईट परिणाम जग आणि देशावर पडत असल्याचं दिसत आहे. कोरोनामुळे अर्थव्यवस्था ठप्प झाली असून कामगार कपातीचं संकट निर्माण झालं आहे. शिवाय भविष्यात रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर सरन्यायाधीशांना वेळ मिळाला! विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याची याचिका ऐकण्यास सुप्रीम कोर्ट तयार, पण सुनावणी कधी?

IND vs PAK: वैभव सूर्यवंशीचा पुढचा टार्गेट पाकिस्तान? Asian Games मध्ये कधी होऊ शकतो IND vs PAK सामना, जाणून घ्या

Accident News: भीषण दुर्घटना! टाटा सुमोवर दरड कोसळली, १३ जणांचा जागीच मृत्यू, काही जखमी, मृतांमध्ये चिमुकल्याचाही समावेश

NEET Protest: विद्यार्थी आंदोलनातून CJP च्या उदयानं काँग्रेसला मागे टाकलं? विरोधकांचं गणित कसं बदललं? जाणून घ्या संपूर्ण क्रोनॉलॉजी...

Ashadhi Ekadashi 2026: साबुदाणा भिजवायला विसरलात? न भिजवता बनवा उपवासाचे क्रिस्पी मेदूवडे!

SCROLL FOR NEXT