Uddhav Thackeray Eknath Shinde esakal
देश

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या गटाला नवीन संसदेत कार्यालय मिळणार? खासदारांनी घेतली लोकसभा अध्यक्षांची भेट

संतोष कानडे

नवी दिल्लीः संसदेमध्ये असलेलं शिवसेनेचं कार्यालय काही दिवसांपूर्वी शिंदे गटाला देण्यात आलेलं होतं. परंतु आता ठाकरे गटाला नवीन संसदेमध्ये स्वतंत्र कार्यालय मिळण्याची शक्यता आहे. आज खासदारांनी लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर पक्षावर हक्क सांगायला सुरुवात केली. आता पक्षच एकनाथ शिंदेंच्या ताब्यात आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाचं काय होणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यातच आता ठाकरे गटासाठी एक चांगली बातमी आहे.

काही दिवसांपूर्वी संसदेमध्ये असलेल्या शिवसेना कार्यालयाचा ताबा शिंदेंच्या शिवसेनेला देण्यात आलेला होता. आता ठाकरे गटाला नवीन संसदेत कार्यालय मिळण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाच्या खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली आहे.

यापूर्वी लोकसभा अध्यक्षांना खासदारांनी पत्र लिहून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासाठी पक्षकार्यालय देण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता खासदारांनी बिर्ला यांची भेटच घेतली. मात्र लोकसभा अध्यक्षांनी अद्याप याबाबत निर्णय घेतलेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court: आधी सेक्स नंतर ब्लॅकमेल... असंच सुरू राहीलं तर सुसंस्कृत समाजात राहणे कठीण; हायकोर्टाने दिले कारवाईचे आदेश!

Latest Marathi News Live Update : यवतमाळमध्ये आशा स्वयंसेविकांचे काळे कपडे घालून आंदोलन

Rahuri By-Election: अक्षय कर्डिलेंवरच भाजपचा भरवसा; राहुरी पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर, विखे पिता-पुत्रांची कर्डिलेंनाच पसंती?

ठरलं तर मगमधील प्रियासाठी सायलीच्या खऱ्या आईने बनवला खास पदार्थ, अभिनेत्री पोस्ट शेअर करत म्हणाली...

Crime News : अंधश्रद्धेचा कहर! मुलगा बरा व्हावा म्हणून आईने भोंदू मांत्रिकाच्या सांगण्यावरुन दिला मुलीचा नरबळी, राज्यात खळबळ

SCROLL FOR NEXT